तुम्हाला मिळेल हाय इंटरनेट स्पीड
जगातील पहिला 10G क्लाउड ब्रॉडबँड कम्युनिटी शांघायमध्ये लॉन्च करण्यात आला आहे, जो 50G-PON तंत्रज्ञानाद्वारे सपोर्टेड आहे. हा उपक्रम चायना टेलिकॉम, शांघाय कंपनी आणि यांगपू डिस्ट्रीक्ट गव्हर्मेंट यांच्यातील भागीदारी आहे. यांच्यात मुळात लाइटिंग फास्ट इंटरनेट स्पीड देण्यात आला आहे, ज्यामुळे उत्तम डिजिटल अनुभव येईल.
नवा जागतिक विक्रम, मिळेल 10 गीगाबाइट क्लाउड ब्रॉडबँडचा अनुभव
यामध्ये युजर्सना 10 गीगाबाईट क्लाउड ब्रॉडबँडचा अनुभव दिला जाईल. कंपनीचा दावा आहे की, या स्पीडने 8k व्हिडिओ क्वालिटीसह 2 तासांचा 90GB चित्रपट 72 सेकंदात डाउनलोड केला जाऊ शकतो. हा नवा जागतिक विक्रम आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे तुमची काम करण्याची पद्धत बदलेल, असा दावा केला जात आहे. यामध्ये तुम्हाला अल्ट्रा फास्ट ब्रॉडबँड स्पीड मिळेल, ज्यामुळे ऑनलाइन काम करणे सोपे होईल.
रिअल-टाइम डेटा प्रोसेसिंग
चीनचे अल्ट्रा फास्ट डेटा ट्रान्सफर तंत्रज्ञान तुमच्या स्मार्ट होम तंत्रज्ञानामध्ये सुधारणा करेल. हे तंत्रज्ञान रिअल-टाइम डेटा प्रोसेसिंग, लॅग फ्री कम्युनिकेशनसह 10G नेटवर्क प्रदान करते.
काय होईल फायदा
या स्पीडमुळे जे यूजर्स जास्त डेटा ऑनलाईन ट्रान्सफर करतात त्यांना सर्वाधिक फायदा मिळेल. याचा अर्थ कन्टेन्ट प्रोडयुस करणे आणि व्हिडिओ ट्रान्सफर करणे सोपे होईल. याशिवाय सामान्य युजर्सनाही मोठा फायदा मिळण्याची अपेक्षा आहे.