या उपायाने होईल चांगली प्रगती
होलिका दहनाच्या वेळी विड्याची ७ पाने घ्या. त्यानंतर होळीच्या ७ परिक्रमा करा. प्रत्येक परिक्रमेत एक पान होळीच्या अग्नीत टाका. अशा प्रकारे ७ पाने होलिका दहनात जाळा. असे केल्याने कुटुंबात सुखशांती येईल आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची उन्नती होईल.
या उपायाने नकारात्मक शक्ती होतील दूर
करिअरमध्ये प्रगती आणि चांगल्या रोजगारासाठी होळीच्या रात्री एक लिंबू घ्या. हा लिंबू स्वतःवरून सात वेळा उतरवा. त्यानंतर एखाद्या चौकात जाऊन या लिंबूचे चार तुकडे करावेत. त्यानंतर चारी दिशांना लिंबूचा एकेएक तुकडा टाकून द्या आणि घरी परत या. पण लक्षात ठेवा की परत मागे वळून पाहायचे नाही. असे केल्याने करिअर आणि रोजगारमधील सर्व समस्यांतून मुक्ती मिळेल आणि नकारात्मक शक्ती दूर राहतील, असे म्हणतात.
या उपायाने घरी येईल विपुलता
होलिका दहनानंतर जी राख राहते, ती घरी आणून ती लाल कापडात बांधावी. त्यानंतर हे कापड तुम्ही जिथे पैसे ठेवात त्या तिजोरीत ठेवा. असे केल्याने तुमच्या घरी धन-संपत्तीयेईल आणि कर्जातून मुक्ती मिळेल. तसेच शक्य असेल तर होलिक दहनाच्या भस्माचा टिळा रोज लावावा. असे केल्याने ग्रहबाधा, प्रेतबाधा दूर होतात, असे सांगितले जाते.
या उपायाने लक्ष्मी होईल प्रसन्न
फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री होलिका दहनाचा पर्व असतो आणि पौर्णिमेचा संबंध माता लक्ष्मीशी आहे. त्यामुळे होलिका दहनाच्या वेळी लक्ष्मीची ध्यानधारणा करावी आणि श्री सूक्तचे पठण करावे आणि साखरेची आहुती द्यावी. तसेच कार्यसिद्धीसाठी तीन गोमती चक्र घेऊन, प्रार्थना म्हणत अग्नीला अर्पण करावेत आणि नमस्कार करावा. असे केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्ती होईल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.
या उपायाने होईल आरोग्य प्राप्ती
कुटुंबातील कोणी सदस्य एखाद्या आजाराने त्रस्त असेल तर होलिका दहनाच्या रात्री एक विड्याचे पान, एक गुलाबाचे फूल आणि काही बताशे घ्या. त्यानंतर आजारी व्यक्तीवरून ३१ वेळा ते उतरून घ्यावेत. त्यानंतर ही सामुग्री एखाद्या चौकात नेऊन ठेवावी. मागे वळून न पाहाता, परत यावे. असे केल्याने आरोग्या प्राप्ती होईल आणि प्रकृती चांगली राहील असे म्हणतात.