WhatsApp वर चॅटिंगसाठी नंबर सेव्ह करण्याची गरज नाही; जाणून घ्या ही आश्चर्यकारक ट्रिक

WhatsApp वर असे अनेक फीचर्स आहेत ज्याबद्दल युजर्सना माहिती नसते. आज तुम्हाला अशाच एका फीचरबद्दल आम्ही सांगणार आहोत. या फीचरचा वापर करून तुम्ही कोणाचाही नंबर सेव्ह न करता चॅट करू शकता. खरंतर नंबर सेव्ह केला तरच तो चॅटमध्ये दिसतो, परंतु आम्ही जी पद्धत सांगणार आहोत ती खूप वेगळी आहे आणि यामुळे तुमचा वेळ वाचू शकतो.

नंबर सेव्ह न करता कसं करायचं चॅट

जर तुम्हाला व्हॉट्सॲपवर कोणत्याही युजरचा नंबर सेव्ह करायचा नसेल तर आता तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील आणि त्यानंतर तुम्ही कोणत्याही यूजरशी चॅट करू शकता. तुम्ही पुढील ट्रिक वापरू शकता

  • स्मार्टफोनच्या कॉन्टॅक्ट ॲपवर तुम्हाला ज्या युजरशी बोलायचे आहे त्याचा नंबर डायल करावा लागेल.
  • त्यानंतर आता तुम्हाला युजरचा नंबर टच अँड होल्ड करून कॉपी करा.
  • मग व्हॉट्सॲप ओपन करा आणि नवीन चॅट सुरु करण्यासाठी + आयकॉनवर टॅप करा.
  • सर्च विंडोमध्ये ‘you’ टाइप करा म्हणजे तुमचा नंबर दिसू लागेल.
  • तुमचं स्वतःच चॅट ओपन करा आणि आता तो नंबर स्वतः ला पाठवा.
  • नंबर पाठवल्यानंतर नंबरवर सिंगल टॅप करावे लागेल.
  • समोर पॉप-अप विंडो उघडेल.
  • इथे तुम्हाला चॅट किंवा कॉलचा पर्याय दिला जाईल. यामध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार टॅप करू शकता.
  • तुम्ही यापैकी कोणत्याही एका पर्यायावर टॅप करताच, तुम्ही युजरच्या WhatsApp चॅट पेजवर पोहोचाल.

येत आहे व्हॉट्सॲपचे नवीन फीचर

Google Play Beta प्रोग्राम अंतर्गत WhatsApp द्वारे नवीन अपडेट आणले जात आहे. यासाठी नवीन आवृत्ती 2.24.7.6 अपडेट देण्यात येत आहे. व्हॉट्सॲपच्या नवीन अपडेटमध्ये युजर्स त्यांच्या स्टेटसवर 1 मिनिटापर्यंतचे व्हिडिओ शेअर करू शकतील. सध्या हे काही बीटा टेस्टर्सना उपलब्ध करून देण्यात आले आहे.

आलं सर्च बाय डेट फीचर

आता अँड्रॉइड डिवाइसवर ‘सर्च व्हॉट्सॲप मेसेज बाय डेट’ फिचर उपलब्ध झालं आहे. आधी हे फिचर आयओएस, मॅक डेस्कटॉप आणि व्हॉट्सअ‍ॅप वेबवर उपलब्ध होतं. फिचर वापरण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये चॅटमध्ये सर्च करायचं आहे ते चॅट ओपन करा. उजवीकडे कॅलेंडर आयकॉन दिसेल जिथे तुम्ही एखाद्या ठराविक तारखेला आलेला किंवा पाठवलेला मेसेज सर्च करू शकता. कॅलेंडर आयकॉनवर टॅप करून डेट सिलेक्शन टूल मधून तारीख निवडली की त्या तारखेचे मेसेज दिसू लागतील.

Source link

chattingtrickWhatsAppचॅटिंगट्रिकव्हॉट्सॲप
Comments (0)
Add Comment