‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमानं तीन दिवसांत कमावले किती कोटी? बजेटचा आकडा आहे खूपच मोठा

मुंबई: विनायक दामोदर सावरकर यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला. सिनेमाचं बजेट, प्रमोशन पाहता सिनेमा बक्कळ कमाई करेल, असं म्हटलं जात होतं. मात्र तसं होताना दिसत नाहीये. रणदीप हुड्डा यानं दिग्दर्शन केलेला आणि त्याचीच मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नाहीये. सिनेमा २२ मार्च रोजी प्रदर्शित झाला.

ओपनिंग डेला फार काही चांगली कमाई न केल्यानं पुढचे दोन दिवस सिनेमाकडून काही अपेक्षा होत्या. रविवारी या सिनेमाच्या कमाईत किंचित वाढ झाल्याचं पाहायला मिळाळं आहे.

सैकनिल्कच्या रिपोर्टनुसार ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमानं १.०५ कोटींची ओपनिंग केली होती. तर दुसऱ्या दिवशी सिनेमानं २.२५ कोटी कमाई केली. तर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी या चित्रपटानं २.६० कोटींचा गल्ला जमवला. त्यामुळं तीन दिवसांची कमाई ही ५.९० कोटी इतकी झाली आहे. सिनेमाचं बजेट हे तब्बल २० कोटींच्या घरात आहे.

सध्या बॉक्स ऑफिसवर ‘मडगाव एक्सप्रेस’ तसंच काही मराठी सिनेमेही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. तर तीन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेला शैतान सिनेमाही अजूनही काही प्रमाणात चालताना दिसतोय. त्यामुळं बॉक्स ऑफिसवर तगडी स्पर्धा पाहायला मिळतेय.

दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर सिमेमाची टीम अजूनही जोरदार प्रमोशन करताना दिसतेय. एका कार्यक्रमात बोलताना रणदीप म्हणाला की, ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव शाळेपासूनच सर्वांना माहित असतं. परंतु या नावाबद्दलची, त्यांच्या कार्याबद्दलची माझी उत्सुकता प्रचंड वाढत गेली आणि मी त्यांच्याविषयी सगळी माहिती मिळवू लागलो. मी वाचन केलं, काही व्हिडिओज पहिले. हे सगळं करत असतानाच त्यांच्या योगदानावर चित्रपट करावा, हे माझ्या मनात आलं आणि अखेर हे स्वप्न आता पूर्ण झालं आहे.

सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर, सिनेमात संपूर्ण सावरकरांचं आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. तर बॉलिवूडचा सिनेमा म्हटल्यावर काहीशी ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ही घेण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. काही प्रमाणात हा सिनेमा ‘प्रपोगंडा’ स्टाइल मांडणीही करतो, अशा प्रतिक्रियाही सोशल मीडियावर प्रेक्षकांनी दिल्या आहेत. या सिनेमात रणदीप सोबतच अंकिता लोखंडे, अमित सियाल, अपिंदरदीप सिंह यांच्याही भूमिका आहेत.

Source link

box office collection updates in marathiRanadeep HuddaSavarkar biopicswatantra veer savarkar movie budgetswatantrya veer savarkarswatantrya veer savarkar box office collectionswatantrya veer savarkar collectionswatantrya veer savarkar collection day 3रणदीप हुड्डास्वातंत्र्यवीर सावरकर
Comments (0)
Add Comment