मासे पकडताना तरुण गेला वाहून; ३० तासानंतर सापडला मृतदेह!

हायलाइट्स:

  • मासे पकडण्यासाठी गेल्यानंतर तरुण पाण्यात बुडाला
  • सोमवारी सायंकाळी उशिरा खाडीकिनारी आढळला मृतदेह
  • घटनेप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू

रत्नागिरी :मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ कुंभार्ली येथील एक इसम रविवारी दुपारी मासे पकडण्यासाठी गेल्यानंतर पाण्यात बुडाला. त्याचा मृतदेह सोमवारी सायंकाळी उशिरा म्हाप्रळ खाडीकिनारी आढळला आहे. अंकुश वसंत वाघमारे असं ४० वर्षीय मृत व्यक्तीचं नाव आहे.

रविवारी १९ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता सावित्री नदीच्या खाडी किनारी आंबेत म्हाप्रळ पुलाच्या डाव्या बाजूस असलेल्या खाजणात मासे पकडण्याचे काम सुरू होते. तेव्हा अंकुश वाघमारे यांनी अचानक पाण्यात उडी घेतल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर ते पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले.

हृदयद्रावक! १२ वर्षीय मुलीला खांद्यावर घेऊन उपचारासाठी तब्बल ३० किलोमीटरची पायपीट

हा इसम अचानक पाण्यात उडी मारुन गायब झाल्याने ग्रामस्थ आणि पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली आणि शोधाशोध सुरू केली. मात्र २० सप्टेंबर सोमवारी सायंकाळी उशिरा खाडीकिनारी अंकुश वाघमारे यांचा मृतदेह आढळला आहे. तब्बल ३० तर तासानंतर मृतदेह शोधण्यात ग्रामस्थ व पोलीस यंत्रणेला यश आलं.

दरम्यान, या घटनेप्रकरणी अधिक तपास मंडणगड पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गफार सय्यद करत आहेत.

Source link

madangarhRatnagiri newsबुडून मृत्यूमंडणगडरत्नागिरी
Comments (0)
Add Comment