Aerobeat TWS चे फीचर्स
- Aerobeat TWS मध्ये स्लीक मॅट फिनिश आणि प्रीमियम लूकसाठी कॉम्पॅक्ट डिझाइन आहे.
- ॲक्टिव्ह लाईफस्टाईलसाठी तयार केलेल्या कंफर्टेबल फिटिंगमुळे टेन्शन-फ्री वापर करता येतो.
- सेन्सेटिव्ह टच सेन्सरसह, युजर्स म्युझिक आणि कॉल दोन्ही गोष्टी सहजपणे मॅनेज करू शकतात.
- इअरबड्स एचडी क्वालिटी साउंड देतात आणि हाय लेव्हल ऑडिओ एक्सपेरिअन्स देतात.
- 10mm ड्रायव्हर्ससह सुसज्ज Aerobeat उत्कृष्ट ऑडिओ एक्सपेरिअन्सची खात्री करून, क्लॅरिटी आणि वाढीव बाससह अचूक आवाज निर्माण करते.
चार्जिंग आणि कनेक्टिव्हिटी
‘Aerobeat TWS’ एका जलद चार्जवर 40 तासांपर्यंत प्लेटाइम ऑफर करते.
कनेक्टिव्हिटी फ्रंटवर, TWS मध्ये 10 मीटरच्या वायरलेस रेंजसह झटपट जोडणी आणि ब्लूटूथ V5.3 फीचर आहेत, ज्यामुळे त्वरित आणि विश्वासार्ह वायरलेस कनेक्शन सक्षम होते.
किंमत आणि उपलब्धता
‘Aerobeat TWS’ निळा, काळा आणि पांढरा या तीन स्टायलिश रंगांमध्ये उपलब्ध आहे. या उत्पादनाची किंमत.1399 रुपये इतकी असून उत्पादनावर 12 महिन्यांची वॉरंटी समाविष्ट आहे.
‘Aerobeat TWS’ च्या लॉन्च प्रसंगी बोलताना, युनिक्स इंडियाचे सह-संस्थापक इम्रान कागलवाला म्हणाले की , “जेन झेड आणि मिलेनिअल्सशी जोडलेला ब्रँड म्हणून, आम्हाला सतत नावीन्याची गरज समजते. आमची नवोपक्रमाची वचनबद्धता प्रत्येक उत्पादनाचा दर्जा, परवडेल अशी किंमत आणि एक अनोखा युजर एक्सपेरिअन्स सुनिश्चित करते. युनिक्समध्ये, आम्ही सतत विकासाला प्राधान्य देतो, आमच्या ग्राहकांच्या सतत बदलणाऱ्या अभिरुचीनुसार आमची उत्पादने विकसित होतील याची खात्री करून. UX-111 Aerobeat TWS च्या परिचयाने, आम्ही वायरलेसमध्ये नवीनतम प्रदान करण्यास उत्सुक आहोत. “