Xiaomi चा सेल्फी किंग येणार भारतात? ओप्पो-विवोशी भिडण्यासाठी ५ कॅमेऱ्यांचा स्मार्टफोन करणार लाँच

Xiaomi Civi 4 Pro जगातील पहिला स्मार्टफोन आहे जो Snapdragon 8s Gen 3 चिपसेटसह लाँच झाला आहे. हा मोबाइल सर्वप्रथम चीनमध्ये सादर करण्यात आला आहे जो आता भारतीय बाजारात देखील येणार आहे. या फोन संबंधित मोठी बातमी समोर आली आहे की शाओमी सीव्ही ४ प्रो भारतीय बाजारात देखील येईल पंरतु देशात हा Xiaomi 14 Civi नावाने विकला जाईल.

शाओमी १४ सीव्हीची ही बातमी गिजमोचायना वेबसाइटच्या माध्यमातून समोर आली आहे. या टेक वेबसाइटने Mi Code मध्ये हा मोबाइल स्पॉट केला आहे. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की जो स्मार्टफोन चीनमध्ये शाओमी सीव्ही ४ प्रो नावाने आला आहे तो भारतात शाओमी १४ सीव्ही नावाने लाँच होईल. या फोनचे स्पेसिफिकेशन्स तुम्ही पुढे वाचू शकता.
हे देखील वाचा: दोन-दोन सेल्फी कॅमेर्‍यांसह आला Xiaomi चा फोन, इतकी आहे किंमत

Xiaomi Civi 4 Pro चे स्पेसिफिकेशन्स

हा फोन ड्युअल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यात ३२ मेगापिक्सलचा मेन सेन्सर आणि ३२ मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स देण्यात आली आहे. शाओमी सीव्ही ४ प्रो ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ह्याच्या बॅक पॅनलवर ५० मेगापिक्सलचा मेन सेन्सर देण्यात आला आहे, सोबत ५० मेगापिक्सलची पोर्टरेट लेन्स तसेच १२ मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे.

शाओमी सीव्ही ४ प्रो जगातील पहिला स्मार्टफोन आहे जो क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८एस जेन ३ ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच झाला आहे. हा ४नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला चिपसेट आहे जो ३.०गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालतो. Xiaomi Civi 4 Pro स्मार्टफोन २७५० x १२३६ पिक्सल रेजोल्यूशन असलेल्या ६.५५ इंचाच्या अ‍ॅमोलेड स्क्रीनवर लाँच झाला आहे. हा डिस्प्ले १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट, २४०हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट आणि ३०००निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करते, जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस २ च्या प्रोटेक्शनसह येतो.

पावर बॅकअपसाठी शाओमीनं आपला नवीन स्मार्टफोन ४,७००एमएएचच्या बॅटरीसह बाजारात आणला आहे. तसेच ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी मोबाइल ६७वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह आला आहे.

Source link

Xiaomi 14 CiviXiaomi Civi 4 ProXiaomi Civi 4 Pro Launchशाओमी फोनशाओमी सीव्ही ४ प्रो
Comments (0)
Add Comment