आता सर्वांच्या हातात दिसू शकतो Samsung चा फोल्डेबल फोन; स्वस्त Galaxy Z Fold FE लाँच होण्याची शक्यता

जगभरात सॅमसंगच्या फोल्ड आणि फ्लिप फोन्स लोकप्रिय आहेत. Samsung Galaxy Z Fold 6 आणि Samsung Galaxy Z Flip 6 लाँच होण्याची शक्यता आहे. हे फोन दरवर्षी पेक्षा थोडे लावकाचं बाजारात येऊ शकतात. एका रिपोर्टनुसार या दोन्ही मॉडेल्ससह एक स्वस्त फोल्ड मॉडेल देखील बाजारात येऊ शकतो. जो नंतर सादर केला जाईल.

Samsung Galaxy Z Fold 6 आणि Z Flip 6 ची माहिती

रिपोर्टनुसार गॅलेक्सी झेड फोल्ड 6 आणि गॅलेक्सी झेड फ्लिप 6 बनवण्यासाठी जी टेक्नॉलॉजी आणि कम्पोनेंटची गरज आहे ते मे पर्यंत सुरु असण्याची शक्यता आहे त्यामुळे ब्रँड आधीपेक्षा लवकर हे फोल्ड फोन्स सादर करू शकते. अशी चर्चा आहे की हा मोबाइल्स जुलैच्या मिड मध्ये येऊ शकतात.

ही टाइमलाइन कंपनीच्या आधीच्या रिलीज पॅटर्न प्रमाणेच वाटत आहे. कारण गॅलेक्सी झेड फोल्ड ५ आणि गॅलेक्सी झेड फ्लिप ५ गेल्यावर्षी २6 जुलैला आले होते आणि ऑगस्ट मध्ये सेलसाठी उपलब्ध झाले होते. रिपोर्टमध्ये असं देखील सांगण्यात आलं आहे की सॅमसंग कमी किंमतीच्या फोल्ड फोनवर देखील काम करत आहे. जो गॅलेक्सी झेड फोल्ड एफई नावाने येऊ शकतो.

बजेटमध्ये फोल्ड एफई मॉडेल सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या आसपास लाँच होण्याची शक्यता आहे. यात स्टाइलस मात्र मिळणार नाही. एक प्रीमियम गॅलेक्सी झेड फोल्ड “अल्ट्रा” मॉडेल देखील सादर होण्याची शक्यता आहे. ज्याबाबत अंदाज लावला जात आहे की हा कंपनीचा सर्वात महागडा फोन असू शकतो.

Samsung Galaxy Z Fold 6 आणि Z Flip 6 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

आतापर्यंत आलेल्या लीक आणि रिपोर्टनुसार Samsung Galaxy Z Fold 6 मध्ये आधीपेक्षा मोठा डिस्प्ले कव्हर आणि प्रायमरी साइडवर मिळण्याची शक्यता आहे. अशी देखील चर्चा आहे की आउटर डिस्प्ले फोल्ड झालेल्या झेड फोल्ड ६ चा अ‍ॅस्पेक्ट रेश्यो एका सामान्य फोन सारखा बनू शकतो. तसेच Samsung Galaxy Z Flip 6 देखील मोठ्या कव्हर आणि इनर पॅनलसह येऊ शकतो. त्याचबरोबर यात कव्हर स्क्रीन ३.६ इंचापर्यंत मोठी मिळू शकते.

Samsung Galaxy Z Fold 6 मध्ये गॅलेक्सी एस२४ अल्ट्रा प्रमाणे ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यात १/१.३-इंच आकार, एफ/१.७-अपर्चर, एफ आणि ओआयएस टेक्नॉलॉजी असलेला २००एमपी प्रायमरी सेन्सर असू शकतो. तर Z Flip 6 मध्ये युजर्सना ५०एमपीची प्रायमरी लेन्स मिळण्याची शक्यता आहे. Samsung Galaxy Z Fold 6 आणि Z Flip 6 स्मार्टफोन्स एआय टेक्नॉलॉजीसह अँड्रॉइड १४ आधारित वन युआयसह येतील.

Source link

samsungsamsung galaxy z flip 6samsung galaxy z fold 6सॅमसंगसॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ६
Comments (0)
Add Comment