भारत ए आय साठी भावी बाजारपेठ
पुढे ते म्हणाले की, “भारत एआयसाठी भावी मोठी बाजारपेठ आहे आणि आमचे फ्लॅगशिप सॅमसंग बीकेसी स्टोअर आमच्या ‘एआय फॉर ऑल’ दृष्टिकोनाला सादर करते, तसेच हे ‘वन सॅमसंग’ला दाखवेल. स्टोअरच्या विविध झोन्समध्ये ग्राहक वास्तविकतेमधील आमचे एआय दृष्टिकोन पाहू शकतात. स्मार्टर, सर्वोत्तम एक्स्पेरिअन्सेस आपल्या जीवनाला कशाप्रकारे नव्या उंचीवर घेऊन जातील, याचा अनुभव घेऊ शकतात”.
‘एआय फॉर ऑल’
कंपनीच्या ‘एआय फॉर ऑल’ दृष्टिकोनाचा भाग म्हणून सॅमसंगने जानेवारीमध्ये त्यांच्या नवीन गॅलॅक्सी ‘ एस २४’ स्मार्टफोन सिरीजमध्ये गॅलॅक्सी एआय लाँच केले.
भारत मोठी जागतिक बाजारपेठ
हॅन म्हणाले की, “भारत जागतिक स्तरावरील सर्वात मोठी व झपाट्याने विकसित होणारी बाजारपेठ आहे आणि सॅमसंगसाठी ती मोठी संधी देते”.
“भारतात मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान-प्रेमी तरूण ग्राहक आहेत, जे आम्हाला नाविन्यता आणण्यास प्रेरित करतात. हजारो तरूण व उद्योजक तरूण जगामध्ये एआय सारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान लाँच करण्यासाठी आमच्या आरअँडडी सेंटर्समध्ये काम करतात,” असे हॅन म्हणाले.
कनेक्टेड लाइफस्टाईल एक्सपिरीयन्स स्टोअर
सॅमसंगने नुकतेच कनेक्टेड लाइफस्टाइल एक्स्पेरिअन्स स्टोअर बीकेसीचे ओपनिंग केले, जेथे ग्राहक ‘वन सॅमसंग’चा अनुभव घेऊ शकतात. यामधून सॅमसंगचे आधुनिक एआय इनोव्हेशन्स आणि ते कंपनीच्या कनेक्टेड डिवाईसेस इकोसिस्टमला कशाप्रकारे साह्य करतात हे दिसून येते.
कंपनी २८ वर्षांपासून भारतात कार्यरत आहे, जेथे १९९५ मध्ये कार्यसंचालनांना सुरूवात झाली होती. सॅमसंग दोन अत्याधुनिक उत्पादन प्लांट्स, तीन आरअँडडी सेंटर्स आणि एका डिझाइन सेंटरसह भारतासाठी कटिबद्ध आहे आणि यांच्या सर्व केंद्रांमध्ये हजारो कर्मचारी कार्यरत आहेत.