अशाप्रकारे मिळेल स्क्रीन शेयर करण्याची सुविधा
- डिवाइस म्हणजे फोन किंवा पीसीवर लेटेस्ट व्हॉट्सअॅप व्हर्जन डाउनलोड करा.
- त्यानंतर स्क्रीन शेयरिंग फक्त चालू व्हिडीओ कॉल दरम्यानच उपलब्ध होईल.
- इथे एक वन-ऑन-वन आणि ग्रुप व्हिडीओ कॉलिंग दरम्यान चालतो.
- त्यानंतर कोणत्याही कॉन्टॅक्टसह पर्सनल किंवा ग्रुप व्हिडीओ कॉल करा.
- त्यानंतर स्क्रीन शेयर ऑप्शन सेलेक्ट करा.
नोट – स्क्रीन शेयरिंग दरम्यान प्रायव्हसीचा प्रॉब्लम होऊ शकतो कारण कॉलिंग दरम्यान देखील स्क्रीनशॉट घेऊ शकतो.
iPhone किंवा Android स्मार्टफोनवरून अशी करा स्क्रीन शेयर
- सर्वप्रथम व्हॉट्सअॅप ओपन करा.
- त्यानंतर कॉन्टॅक्टसह व्हिडीओ कॉल चालू करा.
- सुरु असलेल्या कॉल दरम्यान, खाली असलेल्या रिबनवरील नवीन “स्क्रीन शेयर” बटनवर टॅप करा.
- आता तुमच्या डिव्हाइसवर स्क्रीन शेयर डिस्प्लेची सुविधा मिळेल.
विंडोज आणि पीसीवर अशी करा स्क्रीन शेयर
- मायक्रोसॉफ्ट स्टोरवरून WhatsApp अपडेट ओपन करा.
- त्यानंतर पर्सनल किंवा ग्रुप व्हिडीओ कॉल करा.
- त्यानंतर “स्क्रीन शेयर” बटनवर टॅप करा.
- स्क्रीन शेयरिंगसाठी क्रोम किंवा फाईल एक्सप्लोरर बटनवर टॅप करा.
- त्यानंतर स्क्रीन शेयर होईल.
नोट – व्हॉट्सअॅपवरून पर्सनल कंप्यूटर किंवा फोनची स्क्रीन शेयर करण्यासाठी तुमच्याकडे व्हॉट्सअॅपचा लेट्स्ट व्हर्जन असणं आवश्यक आहे. तरच व्हिडीओ कॉलिंग दरम्यान स्क्रीन शेयर करता येईल.
व्हॉट्सअॅपवर Status Mention
सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर मिळणाऱ्या फीचर्स आणि अपडेट्सची माहिती देणाऱ्या WABetaInfo वेबसाइटनं सांगितलं आहे की नवीन फीचर WhatsApp Android २.२४.६.१९ बीटा अपडेटमध्ये देण्यात येईल. हे फीचर बीटा टेस्टर्सना त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील कोणत्याही युजरला स्टेटस मध्ये मेंशन करू देईल आणि याचे नाव Status Mention असं सांगण्यात आलं आहे. एखाद्या कॉन्टॅक्टला स्टेटसमध्ये मेंशन केल्यावर तशीच नोटिफिकेशन मिळेल जशी एखादा मेसेज आल्यावर मिळते. त्यामुळे त्यांना इतर स्टेटस बघण्याची गरज नाही आणि स्टेटस अपलोड करणाऱ्याला त्या व्यक्तीने स्टेटस पाहिलं की नाही याची वाट पाहावी लागणार नाही.