तिप्पट होईल इंटरनेट स्पीड; Jio नं लाँच केली धन-धना-धन ऑफर

Jio नं AirFiber Plus युजर्ससाठी नवीन Dhan Dhana Dhan ऑफर ची घोषणा केली आहे. यामुळे नवीन आणि जुन्या ग्राहकांना ६० दिवस तिप्पट इंटरनेट स्पीड मोफत मिळेल. नवीन एअरफायबर प्लस ऑफर आयपीएल २०२४ स्पर्धेच्या वेळी आली आहे, त्यामुळे JioCinema अ‍ॅपवर मोफत स्ट्रीम करता येईल. चला जाणून घेऊ ऑफर बाबत.

जिओ एअरफायबर धन धना धन ऑफर

Jio AirFiber Plus धन धना धन ऑफर मध्ये ग्राहकांचा इंटरनेट स्पीड वाढवला जाईल. जिओनं दिलेल्या माहिती नुसार वाढलेला स्पीड जुन्या स्पीड पेक्षा तिप्पट फास्ट असेल.ही ऑफर १६ मार्च, २०२४ पासून ६० दिवस देशातील सर्व नवीन आणि जुन्या ग्राहकांसाठी वैध आहे.नवीन युजर्स जे Jio AirFiber Plus कनेक्शन घेत आहेत, त्यांना यशस्वी रिचार्ज नंतर आपोआप वाढलेल्या स्पीडवर अपग्रेड केलं जाईल.जुन्या युजर्सना स्पीड अपग्रेड संबंधित Jio कडून एक ईमेल आणि एसएमएस मिळेल. ही ऑफर त्या ग्राहकांसाठी असेल जे ६ महीने किंवा १२ महिन्याच्या Jio AirFiber Plus प्लॅन वर आहेत.

स्पीड बूस्टर ऑफर खासकरून Jio AirFiber युजर्ससाठी उपलब्ध आहे जे 5G-आधारित FWA टेक्नॉलॉजीचा वापर करत आहेत. विशेष म्हणजे Jio 5G सिम कार्डचा या ऑफरमध्ये समावेश नाही. तसेच ही ऑफर Jio Fibre FTTH (फायबर टू द होम) युजर्ससाठी देखील नाही. Jio चे लक्ष्य एअरफायबर युजर्सना वाढलेल्या इंटरनेट स्पीडच्या माध्यमातून आयपीएल २०२४ च्या स्ट्रीमिंग दरम्यान बेस्ट एक्सपीरियंस देण्याचे आहे. JioCinema सर्व आयपीएल २०२४ सामने 4K रिजोल्यूशनमध्ये मोफत मध्ये स्ट्रीम करता येतील. युजर्स कंपेटिबल 4K टीव्ही आणि डिस्प्लेवर देखील मॅच पाहू शकतात.

Jio चा नवीन 49 रुपयांचा पॅक

जिओचा नवीन डेटा पॅक कंपनीनं फक्त ४९ रुपयांमध्ये लाँच केला आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी फक्त १ दिवस आहे. जरी कंपनीनं आपल्या ४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये १ दिवसाची व्हॅलिडिटी मिळत असली तरी परंतु या प्लॅन अंतगर्त मिळणारे डेटा बेनेफिट तुमच्यासाठी पुरेसे असतिल. Jio कंपनी आपल्या ४९ रुपयांचा प्लॅनसह २ जीबी किंवा ३ जीबी डेटा नव्हे तर एकूण २५ जीबी डेटा देत आहे. २५ जीबी डेटासह तुम्ही JioCinema अ‍ॅप वर IPL 2024 मॅच ऑनलाइन बिनदिक्कत पाहू शकता. कंपनीनं हा प्लॅन खासकरून Cricket Offer अंतगर्त सादर केला आहे. प्लॅनची व्हॅलिडिटी १ दिवस आहे. या प्लॅन अंतगर्त मिळणारा २५ जीबी डेटा तुम्हाला एका दिवसात संपवावा लागेल. या प्लॅन अंतगर्त उरलेला डेटा तुम्हाला दुसर्‍या दिवशी वापरता येणार नाही.

Source link

jiojio airfiberjio dhan dhana dhanjio offersjioairfiber
Comments (0)
Add Comment