रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमाची पाच दिवसांत इतकीच कमाई, सोशल मीडियावर एकच चर्चा

मुंबई: अभिनेता रणदीप हुड्डा सध्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमामुळं चर्चेत आहे. सावरकरांच्या भूमिकेत असलेल्या रणदीपनेच या सिनेमाचं दिग्दर्शनही केलंय. त्याच्या करिअरमधला हा एक महत्त्वाचा सिनेमा असल्याचं तो सांगतो. इतकंच नाही तर या सिनेमासाठी त्यानं घर विकल्याचंही त्यानं एका मुलाखतीत सांगितलं होतं. पण आता सिनेमाची कमाई अपेक्षेप्रमाणं होताना दिसत नाहीये.
बॉक्स ऑफिसवर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमाची सुरुवात फार कमाल झाली नव्हती.पण नंतर विकेंडमुळं सिनेमाच्या कमाईत वाढ झाल्याचं दिसून आलं.

कमाई किती?

रणदीपच्या या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमानं प्रदर्शित झाला त्या दिवशी १.०५ कोटींची ओपनिंग केली होती. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटानं २.२५ कोटी कमाई केली. तर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी या चित्रपटानं २.६० कोटींचा गल्ला जमवला. सुट्ट्यांचा फायदा या सिनेमाला झाल्याचं दिसून आलं. चौथ्या दिवशी सिनेमानं २.१५ कोटींची कमाई केल्याचं दिसून आलं. तर आता पाचव्या दिवशी सिनेमाची कमाई घसरल्याचं पाहायला मिळतंय. पाचव्या दिवशी सिनेमानं १.१० कोटींचा गल्ला जमवला आहे. तर एकूण कमाई ही ९ कोटींच्या जवळपास आहे.

या सिनेमाकडून रणदीपला मोठ्या अपेक्षा होत्या, पण सिनेमानं अपेक्षेप्रमाणं कमाई केली नसल्याचं दिसून येतंय. या सिनेमाच्या बजेटबद्दल बोलायचं झालं तर २० कोटी इतकं या सिनेमाचं बजेट आहे.

रणदीप हुडा… बॉलिवूडचा रांगडा अभिनेता

रणदीप हुड्डा दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज, आनंद पंडित, संदीप सिंग, योगेश राहार यांनी केली आहे. तर रूपा पंडित, सॅम खान, अन्वर अली, पांचाली चक्रवर्ती हे सहनिर्माते आहेत. या चित्रपटची कथा, पटकथा आणि संवाद उत्कर्ष नैथानी आणि रणदीप हुड्डा यानं लिहिले आहेत. या चित्रपटात अंकिता लोखंडे हिनं सावरकर यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

टीका करणाऱ्यांना रणदीपचं उत्तर
दरम्यान, या सिनेमावर प्रपोगंडा असल्याचं म्हणत अनेकांनी टीका केली आहे. यावर बोलताना रणदीप म्हणाला की,’या सिनेमासाठी मला कुणीही मदत केलेली नाहीये. मी माझं घर विकून हा सिनेमा तयार केलाय. तुम्ही कोणत्या प्रपोगंडाबद्दल बोलत आहात? कोण स्वत:चं तीस किलो वजन कमी करुन प्रपोगंडा सिनेमासाठी एक-दीड वर्ष मेहनत करतं?

Source link

box office collection updates in marathiRandeep Hoodaswatantra veer savarkarswatantra veer savarkar box office collectionswatantra veer savarkar movieरणदीप हुड्डास्वातंत्र्यवीर सावरकरस्वातंत्र्यवीर सावरकर कलेक्शनस्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा
Comments (0)
Add Comment