Infinix Note 40 सीरीजमध्ये फास्ट चार्जिंग
मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंग एक स्टेबल कनेक्शन देते. त्यामुळे फास्ट आणि आधी चांगली चार्जिंग मिळते. दुसरीकडे सामान्य वायरलेस चार्जिंग इंडक्शन टेक्नॉलॉजीचा वापर करते, त्यामुळे चार्जिंग प्रोसेस सुरु करण्यासाठी चार्जिंग पॅडवर डिवाइसेजच्या अचूक प्लेसमेंटची आवश्यकता असते. तर दोन्ही पद्धतींमध्ये केबलची गरज भासत नाही. मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंग सुरक्षित मॅकॅनिज्म आणि फास्ट चार्जिंग कपॅसिटीसह जास्त सोपी आणि युजर फ्रेंडली आहे.
Apple iPhone 12 सीरीज पासून अॅप्पल स्मार्टफोनवर MagSafe चार्जिंग ब्रँडिंगसह मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंग मिळते. म्हणजे याची सुरुवात २०२० मध्ये झाली आहे. अँड्रॉइड फोनमध्ये सध्या हे फीचर जास्त उपलब्ध नाही. परंतु असं वाटत आहे की आगामी Infinix Note 40 सीरीज बाजारात येणारा पहिला असा अँड्रॉइड फोन असेल जो या फिचरसह येईल.
Flipkart पेजवरून समजलं आहे की Note 40 सीरीजमध्ये २०W मॅगचार्ज वायरलेस चार्जिंग फीचर असेल. तसेच Note 40 मॉडेल रिवर्स वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल, त्यामुळे युजर्स इतर डिवाइस जसे की फोन, ईयरबड आणि इतर डिवाइस चार्ज करू शकतील. तसेच Note 40 मॉडेल Cheetah X1 सह येतील जी पावर मॅनेजमेंटसाठी एक वेगळी चिप आहे.
Infinix Note 40 सीरीजमध्ये Note 40 आणि Note 40 Pro च्या 4G व्हर्जनचा देखील समावेश आहे. असं वाटत आहे की हा स्मार्टफोन भारतीय बाजारात येणार नाही. परंतु देशात फक्त डायमेन्सिटी ७०२० वर चालणारे 5G मॉडेल जसे की Note 40 Pro आणि Note 40 Pro+ सादर केले जातील.