WhatsApp वरील मोठं झंझट संपणार; छोट्याश्या फीचरमुळे बराच वेळ वाचणार

Android युजर्ससाठी WhatsApp वर एक नवीन फिचर मिळणार आहे अशी बातमी आली आहे. ज्यामुळे हाय -क्वॉलिटी फोटो आणि व्हिडीओ पाठवण्याची प्रोसेस आणखी सोपी होईल. नवीन फीचर मध्ये एक सेटिंग ऑप्शन जोडला जाईल, ज्यामुळे युजर्सना HD किंवा स्टँडर्ड क्वॉलिटी मीडिया पाठवण्याचा पर्याय मिळेल. एकदा निवडल्यानंतर, अ‍ॅप भविष्यातील सर्व मीडिया अपलोड त्याच क्वॉलिटीमध्ये पाठवेल. तसेच WhatsApp नं अलीकडेच युजर्सना खाजगी आणि ग्रुप चॅट मध्ये तीन मेसेज पिन करण्याचं फीचर देण्यास सुरुवात केली आहे.

WhatsApp चे नवीन मीडिया फीचर WhatsApp अपडेट ट्रॅकर WABetaInfo नं अँड्रॉइड २.२४.७.१७ बिल्डसाठी व्हॉट्सअ‍ॅप बीटा मध्ये पाहिला होता. Android साठी बीटा व्हर्जन सोमवारी Google Play बीटा प्रोग्रामच्या माध्यमातून टेस्टर्ससाठी रिलीज करण्यात आला होता. नवीन अपडेट युजर्सना सेटिंग्सच्या माध्यमातून थेट फोटो आणि व्हिडीओची अपलोड क्वॉलिटी सेट करण्यास मदत करेल, त्यामुळे प्रत्येकवेळी नवीन मीडिया अपलोड करताना एचडी मीडिया ऑप्शन निवडावा लागणार नाही.

रिपोर्टमध्ये शेयर करण्यात आलेल्या स्क्रीनशॉट मध्ये Storage and data मेन्यूमध्ये एक नवीन Setting ऑप्शन दिसत आहे. या नवीन सेटिंग ऑप्शनचे नाव Media upload quality आहे आणि यात कथितरित्या Standard quality आणि HD quality अश्या दोन ऑप्शनचा समावेश आहे. एकदा युजरनं यातील एखादा ऑप्शन निवडला तर भविष्यातील अपलोड त्याच क्वॉलिटीमध्ये होतील.

मेसेजिंग प्लॅटफॉर्मनं ऑगस्ट २०२३ मध्ये HD फोटो शेयरिंग फीचर सादर केलं होतं आणि त्यानंतर लगेचच हाय-रिजॉल्यूशन व्हिडीओसाठी सपोर्ट देखील जोडला. परंतु सध्या युजर्सना प्रत्येकवेळी फोटो किंवा व्हिडीओ पाठवताना मॅन्युअल पद्धतीने क्वॉलिटी निवडावी लागते. वारंवार क्वॉलिटी निवडण्याचा ऑप्शन त्या लोकांसाठी उपयुक्त होता ज्यांना न्हेमी स्टँडर्ड क्वॉलिटी मध्ये फाईल्स पाठवायला आवडतात आणि फक्त कधीतरी एचडी फोटो आणि व्हिडीओ शेयर करतात. परंतु ज्या लोकांना एकच ऑप्शन हवा असेल तर त्यांच्यासाठी नवीन फीचर उपयुक्त ठरू शकतं.

Source link

WhatsAppwhatsapp media upload qualityWhatsApp New featureव्हॉट्सअॅपव्हॉट्सअ‍ॅप फिचर
Comments (0)
Add Comment