नीता अंबानी आणि त्यांचा मुलगा आकाश नेहमीच सामन्यादरम्यान मैदानात उपस्थित असतात. परंतु यावेळी त्या संघाची कामगिरी पाहून नाखूष दिसत होत्या आणि आपल्या मोबाइलमध्ये व्यस्त होत्या. त्यांच्या हातातील फोन कोणता यावरून देखील सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. चला पाहूया कोणता मॉडेल आहे.
नीता अंबानी कोणता फोन वापरतात
२७ मार्च २०२४ रोजी सनरायजर्स हैद्राबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२४ च्या सामन्यात नीता अंबानी यांच्या हातात अॅप्पल कंपनीचा आयफोन दिसला आहे. फोनच्या कॅमेरा सेटअपवरून आयफोन १५ प्रो किंवा प्रो मॅक्स असावा असा अंदाज लावला जात आहे. परंतु फोनच्या आकारावरून हा आयफोन १५ प्रो मॅक्स असावा अशी चर्चा आहे, जो आयफोन १५ प्रो सीरिजचा सर्वात महागडा फोन आहे.
विशेष म्हणजे नीता अंबानी सामान्य आयफोन १५ प्रो मॅक्स वापरत असाव्यात कारण बॅक पॅनलवर कोणतंही कस्टमायजेशन दिसत नाही. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार नीता अंबानी कस्टमाइज Falcon Supernova iPhone 6 Pink Diamond हा मॉडेल वापरतात, ज्याची किंमत ४०० कोटींच्या घरात आहे. परंतु काल त्यांच्या हातात हा फोन दिसला नाही.
आयफोन १५ प्रो मॅक्सची किंमत किती
आयफोन १५ प्रो मॅक्सची किंमत १,५९,९०० रुपयांपासून सुरु होते. ही फोनच्या बेस मॉडेलची किंमत आहे, ज्यात २५६जीबी स्टोरेज मिळते. तर ५१२ जीबी स्टोरेज मॉडेल तुम्ही १,७९,९०० रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तर टॉप मॉडेल १टीबी स्टोरेजसह येतो ज्याची किंमत १,९९,९०० रुपये आहे. नीता अंबानी यांच्या हातात टायटेनियम व्हाइट कलर दिसत आहे.
iPhone 15 Pro Max चे स्पेसिफिकेशन्स
iPhone 15 Pro Pro Max मध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा ओएलईडी सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आहे जो १२० हर्ट्झ प्रोमोशन, एचडीआर, ट्रू टोन, डायनॅमिक आयलंड आणि सिरॅमिक शिल्डला सपोर्ट करतो. यात अल्वेज ऑन डिस्प्लेचा सपोर्ट देखील मिळतो.
या आयफोनमध्ये ३ नॅनोमीटर प्रोसेसवर बनलेला ए१७ प्रो चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर १टीबी पर्यंतची स्टोरेज मिळते. iPhone 15 Pro Max आयओएस १७ वर चालतो. यात आयपी६८ रेटिंग मिळते ज्यामुळे पाणी आणि धुळीपासून संरक्षण होते. तसेच स्टिरिओ स्पीकर आणि १५ वॉट मॅगसेफ वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळतो.
iPhone 15 Pro Max च्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात ४८ मेगापिक्सलचा वाइड अँगल प्रायमरी कॅमेरा आहे, जो सेन्सर शिफ्ट ओआयएसला सपोर्ट करतो. त्याचबरोबर १२ मेगापिक्सलची अल्टा वाइड लेन्स आणि १२ मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा मिळतो जो ५एक्स झूमला सपोर्ट करतो. तर फ्रंटला ट्रूडेप्थ १२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो.