अत्यंत शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र
Sagittarius A* नावाचे कृष्णविवर आपल्या आकाशगंगेच्या अगदी मध्यभागी आहे. ते पृथ्वीपासून 27 हजार प्रकाशवर्षे दूर आहे. EHT ब्लॉगनुसार, हे एक महाकाय कृष्णविवर आहे ज्याच्या दोन्ही टोकांना अत्यंत शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र असल्याचे म्हटले जाते. द ॲस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्समध्ये या अभ्यासाचा उल्लेख करण्यात आला आहे. जे सूचित करते की,अशा प्रकारचे चुंबकीय क्षेत्र सर्व कृष्णविवरांभोवती असणे आवश्यक आहे.
Sagittarius A* आधीही सापडले कृष्णविवर
ब्लॅक होल Sagittarius A* हे EHT ला सापडलेले पहिले कृष्णविवर नाही. यापूर्वी 2019 मध्ये, आकाशगंगा M87 च्या मध्यभागी असेच एक कृष्णविवर सापडले होते. हे कृष्णविवर आकाशगंगेच्या कृष्णविवरापेक्षा हजारो पट मोठे आणि दूर असल्याचे म्हटले जाते. 2021 मध्ये, EHT टीमने ध्रुवीकृत प्रकाशातील ब्लॅक होलचे निरीक्षण केले आणि त्याभोवती चुंबकीय रेषांचा एक तक्ता तयार केला जो चुंबकीय क्षेत्र रेषांभोवती फिरत असलेल्या कणांचे नमुने दाखवतो. या तंत्राच्या मदतीने, संशोधकांनी Sagittarius A* च्या आसपासचे चुंबकीय क्षेत्र देखील शोधले.
अनेक छायाचित्रांतून तयार केली प्रतिमा
अहवालात म्हटले आहे की, Sagittarius A* पाहणे आणि पकडणे हे खूप कठीण काम होते. यासाठी टीमने अनेक कोनातून त्याची छायाचित्रे घेतली आणि नंतर ती एकत्र करून प्रतिमा तयार केली. तैवानमधील ॲकॅडेमिया सिनिकाचे खगोलशास्त्रज्ञ जेफ्री बोवर यांच्या मते, जेव्हा Sagittarius A* चे चित्र घेण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा ते त्याच्या जागी सापडले नाही. ते हलत होते. त्यामुळे तिची नॉन-पोलराइज्ड इमेज कॅप्चर करणेही खूप अवघड होते.