पासवर्डने करा सिमकार्ड लॉक; नाहीतर होईल फोनचा ‘असा’ गैरवापर, जाणून घ्या सिमकार्ड लॉकची पद्धत

तुमचा फोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, सिम कार्ड लॉक असतानाही त्याचा गैरवापर होऊ शकतो. चोर किंवा हल्लेखोर तुमच्या फोनमधून सिमकार्ड काढू शकतात आणि ते दुसऱ्या फोनमध्ये घालून वापरू शकतात. अशा प्रकारे, तुमचे बँकिंग वन-टाइम-पासवर्ड (OTP) संदेश देखील त्यांच्या हातात पडतील. अशावेळी सिमकार्ड ताबडतोब लॉक करणे हा एक उत्तम पर्याय आहे.

करा सिम लॉक

गेल्या काही दिवसांत सिम स्वॅपिंग घोटाळ्यातही झपाट्याने वाढ झाली असून हल्लेखोर निष्पाप युजर्सना फसवणुकीचे बळी बनवत आहेत. सिमकार्डशी संबंधित घोटाळे आणि सायबर गुन्हे टाळण्यासाठी सिम लॉक करणे देखील महत्त्वाचे आहे. फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन तुम्ही सिम कार्डसाठी पिन किंवा पासवर्ड सहज सेट करू शकता. अशाप्रकारे, नवीन फोनमध्ये सिमलावल्यावर, पिन टाकल्याशिवाय सिम वापरता येत नाही.

अशा प्रकारे करू शकता तुमचे सिम कार्ड लॉक

  1. सर्वात आधी तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जा आणि वरच्या बाजूला दिलेल्या सर्च बारमध्ये SIM Card Lock लिहून सर्च करा.
  2. पर्याय म्हणून, पासवर्ड आणि सिक्युरिटी सेटिंग्जवर टॅप केल्यानंतर तुम्ही सिस्टम सिक्युरिटीवर जाऊ शकता, जिथे तुम्हाला हा पर्याय मिळेल.
  3. सॅमसंग यूजर्स बायोमेट्रिक्स आणि सिक्युरिटी सेक्शनमधील इतर सिक्युरिटीवर टॅप करून हे फीचर बघू शकतील.
  4. आता सिम कार्ड लॉकवर टॅप करा.
  5. तुम्हाला डीफॉल्ट सिम एंटर करण्यास सांगितले जाईल, जे 0000 आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीचा नवीन पिन तयार करू शकाल.
  6. या पिनच्या मदतीने सिम कार्ड लॉक केल्यानंतर, प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही फोन रीस्टार्ट कराल किंवा नवीन फोनमध्ये सिम टाकाल तेव्हा तुम्हाला प्रथम पिन टाकावा लागेल.

चुकीचा पिन टाकल्यास केली जाते PUK कोडची मागणी

कोणत्याही परिस्थितीत, चुकीचा पिन 3 पेक्षा जास्त वेळा प्रविष्ट केला असल्यास, PUK कोडची मागणी केली जाते, जी दूरसंचार ऑपरेटरशी संपर्क साधल्यानंतरच कळते. अशा प्रकारे, तुमच्या सिम कार्डचा अजिबात गैरवापर होऊ शकत नाही आणि एक प्रकारे ते लॉक केले जाते, ज्याची किल्ली तुमच्याकडे पिनच्या स्वरूपात असते.

Source link

misuseMobileSIM Cardगैरवापारमोबाईलसीमकार्ड
Comments (0)
Add Comment