सध्या iPhone 15 बाजारात
सध्या iPhone 15 बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. हे आयफोनचे नवीनतम मॉडेल आहे, ज्यामध्ये युजर्सना अनेक उत्कृष्ट फीचर्स मिळतात. आयफोनच्या चाहत्यांमध्ये या फोनची वेगळीच क्रेझ आहे. लुक, कॅमेरा क्वालिटी, बिल्ड क्वालिटी, फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर आयफोन 15 ला काही तोडच नाही. हा फोन सर्वच बाबतीत सर्वोत्कृष्ट असल्याचे सिद्ध झाले असून चाहत्यांनी त्याला भरभरून प्रेमही दिले आहे. मात्र,आज आयफोनच्या पहिल्या मॉडेलबद्दल माहिती देणार आहोत. अलीकडेच, पहिल्या आयफोनचा लिलाव त्याच्या मूळ किंमतीच्या 260 पटीने झाला.
आयफोनच्या पहिल्या मॉडेलचा लिलाव
आजच्या काळात जवळपास प्रत्येकालाच iPhone 15 घ्यायचा असतो. त्याची किंमत थोडी जास्त आहे त्यामुळे प्रत्येकाला ती विकत घेणे शक्य नाही. पण, तुम्हाला माहीत आहे का आयफोनचे पहिले मॉडेल कधी लाँच झाले आणि त्याची किंमत काय होती? आयफोनच्या पहिल्या प्रकारात युजर्सना कोणत्या सुविधा मिळाल्या आणि ते कसे दिसले? नुकतेच आयफोनच्या पहिल्या मॉडेलचा लिलाव करण्यात आला आहे. या लिलावात हा फोन 1 लाख 30 हजार डॉलर्स (भारतीय रुपयांमध्ये सुमारे 1.10 कोटी रुपये) विकला गेला. ही रक्कम या फोनच्या मूळ किंमतीपेक्षा 260 पट जास्त आहे.
आयफोन मॉडेल का होते खास
आयफोनच्या पहिल्या मॉडेलचा इतक्या मोठ्या किमतीत लिलाव होण्यामागचं एक कारण म्हणजे तो सीलबंद पॅक असलेला आयफोन आहे. आयफोनचे 4GB मॉडेल खास आहे कारण Apple ने ते काही महिन्यांसाठी बनवले. नंतर कंपनीने 8GB मॉडेल आणले.
आयफोनचे पहिले मॉडेल केले होते 2007 मध्ये लाँच
Apple ने जानेवारी 2007 मध्ये आयफोनचे पहिले मॉडेल लॉन्च केले होते. लुकबद्दल बोलायचे तर, पहिल्या पिढीचा आयफोन आकाराने कॉम्पॅक्ट होता आणि युजर्स ते सहजपणे त्यांच्या खिशात ठेवू शकत होते. आजच्या नवीनतम iPhones पेक्षा तो वेगळा होता आणि त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हे मॉडेल दिसायलाही एकदम स्टायलिश होते. त्याची विक्री 29 जून 2007 पासून सुरू झाली. पहिला iPhone 4 GB आणि 8 GB व्हेरिएंट पर्यायांसह बाजारात लॉन्च करण्यात आला होता.