हायलाइट्स:
- श्रावण संपताच चिकन, अंडी महागले
- खवय्यांना महागाईची फोडणी
- मासांहार महागला
मुंबईः श्रावण महिना सुरू झाल्यानंतर मासांहर टाळला जातो. मात्र, आता श्रावण महिना आणि गणेशोत्सव संपल्यानं पुन्हा एकदा खवय्यांनी मासांहराकडे वळले आहेत. कडक श्रावणमास पाळणाऱ्या मांसाहार खवय्ये चिकन, अंड्यावर यथेच्छ ताव मारण्याची संधी पाहत असतानाच खवय्यांना महागाईची फोडली बसली आहे. श्रावण संपताच अंडी आणि चिकनच्या दरात वाढ झाली आहे.
श्रावणमासात वैद्यकीयदृष्ट्या मांसाहार पचण्यास जड असते. तसेच, याच काळात पावसाळा असल्याने रोगराई पसरण्याची शक्यता बळावते. परिणामी, मांसाहार टाळला जातो. मात्र, श्रावण संपल्यानंतर खवय्ये मासांहरावर यथेच्छ ताव मारतात. मात्र, चिकन, अंडीच्या दरात वाढ झाल्यानं खवय्यांची थोडी निराशा झाली आहे.
वाचाः क्षणात पत्त्यांसारखी कोसळली तीन मजली इमारत; जळगावातील थरारक घटना
गेल्या दोन ते तीन दिवसांत कोंबडी व अंड्यांच्या दरात वाढ झाली आहे. बॉयलर आणि गावठी कोंबडीच्या दरात प्रतिकिलोमागे १० रुपयांनी तर, अंड्याच्या दरात प्रति नग १ रुपयांनी वाढ झाली आहे.
वाचाः महंत नरेंद्र गिरींचा संशयास्पद मृत्यू; संजय राऊतांनी केली ‘ही’ मागणी
चिकनचे दर
बॉयलर कोंबडी आधी १२० रुपये प्रति किलो होती ती आता १४० ते १५० रुपये प्रति किलो झाली आहे. तसंच, गावठी कोंबडी ४३० रुपये प्रति किलोनी होती ती आता ४४० ते ४६० रुपये प्रति किलो झाली आहे. तर, अंडी प्रति नग पाच रुपये दराने विक्री केले जात होती ते आता ६ रुपये दराने विक्री केले जात आहे.
वाचाः आधी हाताची नस कापली नंतर गळफास; मिस पिंपरी चिंचवडच्या आत्महत्येने खळबळ