मुंबई– तब्बू, करीना कपूर खान, क्रिती सेनॉन यांचा ‘क्रू’ हा सिनेमा ‘गुड फ्रायडे’ च्या मुहूर्तावर २५०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. राजेश ए. कृष्णन दिग्दर्शित या चित्रपटाच्या अडव्हान्स बुकिंगने कमाल केली नसली तरी हॉलिडे रिलीजमुळे सिनेमाला चांगलेच यश मिळत आहे. ही कथा आहे तीन एअर होस्टेसची, ज्यांच्या आयुष्यात स्वतःच्या भलत्याच समस्या असतात. तिघींवर आर्थिक अडचण असते. चित्रपटाची कथा कॉमेडी आहे, जी प्रेक्षकांना हसायला भाग पाडते. या कथेत सोन्याची तस्करी आणि कोहिनूर हिरा देशातून परत आणण्याचा प्रयत्न या तीन अभिनेत्रींकडून केला जात आहे.चला जाणून घेऊया या चित्रपटाने किती कमाई केली.या चित्रपटाचे संवाद चांगले असते तर हा चित्रपट एक उत्तम मनोरंजन करणारा ठरू शकला असता. करिनाच्या कामाची खूप प्रशंसा केली जात आहे, तर तब्बू आणि क्रितीची पात्रे यापूर्वी पाहिल्याप्रमाणेच आहेत. यंदा बॉलिवूडचे चित्रपट गेल्या वर्षीप्रमाणे बॉक्स ऑफिसवर फारसे कमाल दाखवू शकले नसले तरी हा चित्रपट आशेचा किरण असल्याचे दिसते. शनिवार आणि रविवारी हा चित्रपट वीकेंडला चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.
‘क्रू’ची कमाई
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या वर्षी रिलीज झालेल्या चित्रपटांपेक्षा या चित्रपटाने ओपनिंग डेवर चांगली कमाई केली आहे. पहिल्या दिवसाच्या कमाईवर नजर टाकली तर या चित्रपटाने जवळपास ८.७५ कोटींची कमाई केली आहे. अद्याप जगाभराचा रिपोर्ट आलेला नाही.
‘क्रू’ची कमाई
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या वर्षी रिलीज झालेल्या चित्रपटांपेक्षा या चित्रपटाने ओपनिंग डेवर चांगली कमाई केली आहे. पहिल्या दिवसाच्या कमाईवर नजर टाकली तर या चित्रपटाने जवळपास ८.७५ कोटींची कमाई केली आहे. अद्याप जगाभराचा रिपोर्ट आलेला नाही.
पहिल्या दिवशी क्रू किती जण पाहायला गेले….
सिनेमा पाहायला गेलेल्यांच्या संख्येबद्दल बोलायचे झाल्या, हिंदीत २२.२५% जणांनी हा सिनेमा पाहिला. सकाळच्या शोला १३.९३ %, दुपारचे शो २४.६३% आणि संध्याकाळच्या शोला २८.१८ % प्रेक्षकांची उपस्थिती होती. रात्रीच्या शोमध्ये सर्वाधिक शो हाऊसफुल होते. तेव्हा ३८.६२ % लोक हा सिनेमा पाहायला गेलेले.