हायलाइट्स:
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र
- साकीनाका बलात्कार प्रकरणावर व्यक्त केली चिंता
- महिलांच्या सुरक्षेबाबत व्यक्त केली चिंता
मुंबईः काही दिवसांपूर्वी घडलेल्या साकीनाका बलात्कार प्रकरणी विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरलं असतानाच आता राज्यपालांनीही या प्रकरणात उडी घेतली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी साकीनाका प्रकरणी एक पत्र लिहलं आहे. या पत्रात त्यांनी दोन दिवसीय विशेष अधिवेशन घेण्याचे निर्देश दिले आहेत.
साकीनाका बलात्कार प्रकरणी राज्यात मोठी खळबळ उडाली होती. गणेशोत्सवाच्या काळात घडलेल्या या घटनेनं हळहळ व्यक्त केली जात होती. मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणाची दखल हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा, असे आदेश दिले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून निर्देश दिले आहेत.
वाचाः श्रावण संपला पण खवय्यांची निराशा; चिकन, अंडीच्या दरात वाढ
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात त्यांनी साकीनाका बलात्कार प्रकरणावरुन चिंता व्यक्त केली आहे. तसंच, राज्यातील कायदा व सुव्यवस्था, महिलांच्या सुरक्षेबाबतही पत्रात नमूद करण्यात आलं आहे. या विषयांवर चर्चा करून पावलं उचलण्यासाठी विधिमंडळाचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलविण्याची राज्यपालांनी सरकारला सूचना केली आहे.
वाचाः क्षणात पत्त्यांसारखी कोसळली तीन मजली इमारत; जळगावातील थरारक घटना
साकीनाका बलात्कार प्रकरण; काय घडले?
साकीनाका येथील रशीद कंपाऊंड परिसरात शुक्रवारी पहाटेच्या वेळी मोहन चौहान या नराधमाने त्याला परिचित असलेल्या महिलेची अत्यंत निर्घृण हत्या केली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. त्यारात्री मोहनने केलेल्या अमानुष मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली होती. रुग्णालयात उपचार सुरू असताना, तिचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या प्रकरणात आरोपीविरोधात न्यायालयात लढा देण्यासाठी ज्येष्ठ वकील राजा ठाकरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे प्रकरण ठाकरे हाताळणार असून, ते तपासात मार्गदर्शनही करत असल्याचे नगराळे म्हणाले.
वाचाः महंत नरेंद्र गिरींचा संशयास्पद मृत्यू; संजय राऊतांनी केली ‘ही’ मागणी