बदलणार आहेत स्मार्टफोनचे नियम; आता नाही मिळणार ‘ही’ अत्यावश्यक सेवा, 15 एप्रिलपासून लागू होणार नियम

दूरसंचार विभाग स्मार्टफोनबाबत वेळोवेळी नवनवीन निर्णय घेत असतो. आता 15 एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत USSD-आधारित कॉल फॉरवर्ड इनॅक्टिव्ह करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आपल्या आदेशात दूरसंचार विभागाने म्हटले आहे की, ऑप्शनल म्हणून ते नंतर पुन्हा सुरू केले जाऊ शकतात. सध्या मात्र त्यात 15 एप्रिलनंतर बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अनधिकृत ॲक्टिव्हिटीजसाठी वापरला जातोय डेटा

यूएसएसडी सेवा वापरण्यासाठी, ग्राहक फक्त स्क्रीनवर एक कोड डायल करतात. सध्या या सेवेचा वापर मोबाइल फोनचा आयएमईआय क्रमांक आणि शिल्लक तपासण्यासाठी केला जातो. वास्तविक फसवणूक आणि ऑनलाइन गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी हा आदेश काढण्यात आला आहे. 28 मार्च रोजीच्या आदेशात DoT ने म्हटले आहे की, अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिस डेटा (USSD) अनधिकृत ॲक्टिव्हिटीजसाठी वापरला जात आहे.म्हणजेच आता स्मार्टफोनवर अशी सुविधा मिळणार नाही. यामुळेच आता यूएसएसडी-बेस्ट कॉल फॉरवर्डिंग सेवा 15 एप्रिल 2024 पासून बंद केली जात आहे.

सुविधा पुन्हा होऊ शकते सुरु

ही सुविधा किती दिवस बंद राहणार याबाबत अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. काही काळानंतर ते पुन्हा सुरू केले जाऊ शकते. सध्या यासंदर्भातील पैलू तपासले जात आहेत.

सायबर गुन्हे रोखण्यासाठी निर्णय

सरकारी संस्थेने असा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही सिमकार्ड देण्याबाबत असाच निर्णय घेण्यात आला होता. नवीन सिमकार्ड घेण्यासाठी ई-व्हेरिफिकेशन करावे लागेल, असे सांगण्यात आले होता. म्हणजे प्रत्यक्ष पडताळणी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता यूएसएसडी आधारित कॉल फॉरवर्ड बंद करण्याचा निर्णयही याच क्रमाने घेण्यात आला आहे. मात्र, ते अद्याप कायमचे थांबलेले नाही.

Source link

call forwarddotकॉल फॉरवर्डडीओटीस्मार्टफोन्स​Smartphones
Comments (0)
Add Comment