Oppo ने केली अधिकृत घोषणा
Oppo ने अधिकृतपणे नवीन ‘ColorOS AI’ वैशिष्ट्याची घोषणा केली आहे. हा Xiaobu नावाचा AI असिस्टंट जो Oppo च्या AndesGPT वर चालतो. हे युजर्सना इंग्रजी शिकण्यास, मुलाखतीची तयारी करण्यास आणि बरेच काही करण्यास मदत करेल.
करेल इंटरव्ह्यूची तयारी
ColorOS AI तुम्हाला मुलाखतीसाठी तयारी करण्यात मदत करेल. ColorOS AI तुम्हाला मुलाखतींचे अनुकरण करण्यास आणि चॅट फॉर्ममध्ये आवश्यक स्किल शिकण्यास मदत करते. नेव्हिगेट स्क्रीनवर “Xiaobu असिस्टंट” शोधून आणि असिस्टंट फीचर्समध्ये “Xiaobu Interviewer” निवडून तुम्ही Oppo आणि OnePlus डिव्हाइसेसवर हे फीचर मिळवू शकता.
निभावेल इंग्रजी शिक्षकाची भूमिका
तुम्हाला इंग्रजी शिकण्यात, अगदी निबंध लिहिण्यातही हे फीचर मदत करेल. ही फंक्शनॅलिटी इंग्रजी शिक्षकाची भूमिका देखील बजावते आणि तुम्हाला इंग्रजी शिकण्यात मदत करण्यासाठी ओरल प्रॅक्टिस प्रदान करते. हि ओरल प्रॅक्टिस शब्दसंग्रह प्रश्नमंजुषा, लेखन आणि अनुवादामध्ये मदत करून गोष्टी शिकवते. हे फीचर वापरण्यासाठी, तुम्हाला “Xiaobu Assistant” मध्ये “Xiaobu English Teacher” हा पर्याय दिसेल. जियाबू असिस्टंट तुम्हाला इतर कोणतीही भाषा शिकण्यास मदत करेल की नाही हे सध्या स्पष्ट नाही.
Xiaobu डायलॉग
हा Jiabu सहाय्यक कथितपणे तुमच्यासाठी निबंध लिहू शकतो, तुमच्या सहलींचे नियोजन करण्यात मदत करू शकतो आणि तुम्ही भेट देत असलेल्या रेस्टॉरंटची रिव्ह्यू लिहिण्यासारख्या गोष्टी देखील करू शकतो. तुम्हाला हे वैशिष्ट्य असिस्टंटमध्ये “Xiaobu डायलॉग” म्हणून दिसेल.
Oppo ने केला स्मार्टफोन लॉन्च
स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीचा नवीनतम लॉन्च स्मार्टफोन Oppo Satellite Edition आहे. सध्या कंपनीने ते नुकतेच चिनी बाजारात लॉन्च केले आहे.Oppo च्या Find X सीरीजमधील हा तिसरा स्मार्टफोन आहे. याआधी कंपनीने यात दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. आता या मालिकेत कंपनीने सॅटेलाइट तंत्रज्ञानासह सर्वोत्तम फोन लाँच केला आहे.
नेटवर्कशिवाय केले जातील फोन कॉल
Oppo Find X7 Ultra Satellite Edition चे नावच सूचित करते की कंपनीने या फोनमध्ये सॅटेलाइटशी कनेक्ट करण्याची सुविधा दिली आहे. या स्मार्टफोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे तुम्ही नेटवर्कशिवायही इतरांशी सहज कनेक्ट होऊ शकता. हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी कंपनीने स्मार्टफोनच्या आत एक विशेष प्रकारचा अँटेना दिला आहे. याच्या मदतीने तुम्ही सॅटेलाइटशी कनेक्ट होऊ शकता आणि टू-वे कॉल करू शकता. कॉल्ससोबतच तुम्हाला नेटवर्कशिवाय मेसेज पाठवण्याची सुविधाही असेल.