हायलाइट्स:
- पुढचे ४८ तास राज्यासाठी धोक्याचे
- मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
- परतीचा पाऊस लांबणीवर…
मुंबई : विकेंडनंतर राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यांमध्ये झालेल्या तुफान पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत आहेत तर हाच पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे. पुढच्या ४८ तासांमध्ये पावसाची तीव्रता आणखी वाढणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक असल्यास घराबाहेर पडावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत. (weather today at my location rain report mumbai weather heavy rain in all over maharashtra imd forecast )
ठराविक जिल्हे वगळता राज्यात मुसळधार पाऊस होईल असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. पश्चिम बंगाल परिसरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता पुढच्या ४८ तासात कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २१ ते २३ सप्टेंबर या दरम्यान राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे.
मुंबईत तुफान पावसाला सुरुवात
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, माथेरान, रायगड, ठाणे, मुंबई इथे मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. तर पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधूदूर्ग, विदर्भामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
अहमदनगर, औरंगाबाद, बुलढाणा, कोल्हापूर, अकोला, परभणी आणि नांदेड हे जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर विदर्भातही अमरावती, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज बाहेर पडावं कारण यादरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
परतीचा पाऊस लांबणीवर…
यंदा परतीचा पाऊस लांबणार असल्याचंही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. शेतकऱ्यांना खरिपातील पीक काढण्यासाठी पुरसा वेळ मिळणार आहे. त्यामुळे परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळेल. परतीचा पाऊस ऐनवेळी दगा देत असल्याने दरवर्षी पीक पाण्यात वाहून जातात. पण यंदा लांबणीवर असलेल्या पावसामुळे पिकांची काढणी ही वेळेत करण्यात येणार आहे. खरंतर, यंदा राज्यात परतीच्या पावसाला उशिरा सुरुवात होणार असून महाराष्ट्रातही हा पाऊस उशिरा दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. (weather today at my location rain report mumbai weather heavy rain in all over maharashtra imd forecast )