तुम्हाला माहितीये..कुत्र्याला बोललेलं कळतं, संशोधनात खळबळजनक खुलासा

कुत्र्याच्या मेंदूवर संशोधकांनी अभ्यास केला. यात झालेल्या १८ कुत्र्यांच्या परीक्षणात असे दिसून आले की माणसाप्रमाणेच कुत्र्याचा मेंदू देखिल काम करतो. ते एखादी गोष्ट चटकन लक्षात ठेवू शकतात. त्यांना कळते की आपल्यासमोर कसला विषय सुरु आहे. बुडापेस्ट येथील इओटवोस लॉरँड विद्यापीठात हे संशोधन करण्यात आले आहे. हे संशोधन करंट बायोलॉजी या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.

शब्दानुसार वस्तू ओळखणे शक्य

अभ्यासकर्त्या आणि सह-लेखिका मारियाना बोरोस यांच्या मते, मानवेतर प्राण्यांना संदर्भावर आधारित शब्द समजू शकतात की नाही याबद्दल दीर्घकाळ वाद सुरू आहे. या पबाबतीत अनेक मत मतांतर मांडण्यात येत आहे. बोरोस पुढे म्हणतात की, कुत्र्यांसमोर वस्तूंचा उल्लेख केलास त्यांच्यात शब्दानुसार वस्तू ओळखण्याची क्षमता असते. बोरोस पुढे म्हणतात की कुत्र्यांना शब्दांचा अर्थ कळतो की नाही हे जाणून घेण्याचा आमचा उद्देश होता. वस्तूचे नाव आणि समोरील प्रत्यक्ष वस्तू यात फरक असल्यास कुत्र्यांच्या मेंदूला तसे सिग्नल मिळतात.

असा करण्यात आला अभ्यास

बुडापेस्ट येथील इओटवोस लॉरँड विद्यापीठात करण्यात आलेल्या या संशोधनात कुत्र्यांना परिचित वस्तू व शब्दांचा वापर आला, नंतर समोर ठेवण्यात आलेल्या वस्तूंचे नाव कुत्र्यासमोर घेण्यात आले तर, काही वेळा समोरील वस्तू व शब्दांमध्ये फरक होता. तर काही प्रकरणांमध्ये अशा वस्तू कुत्र्यांसमोर ठेवल्या गेल्या ज्यांचे नाव काहीतरी आणि वस्तू काहीतरी वेगळी होती. त्याचा परिणाम असा झाला की जेव्हा शब्दाशी जुळणारी एखादी वस्तू समोर असते तेव्हा त्यांच्या मेंदूमध्ये वेगळा पॅटर्न दिसायचा आणि शब्दाशी जुळणारी वस्तू समोर नसताना मेंदूमध्ये वेगळा पॅटर्न दिसायचा. माणसांमध्येही हेच दिसून येते.

माणसांप्रमाणे क्षमता

कुत्र्यांसमोर उल्लेख करण्यात आलेल्या शब्दाशी सबंधित वस्तूची प्रतिमा मनात निर्माण करण्याची क्षमता कुत्र्यांमध्ये असते. तसेच, भाषेचे आकलन करुन त्यापद्धतीने ते वावरतात. अभ्यासात असेही दिसून आले आहे की कुत्रे जे दाखवतात त्यापेक्षा जास्त समाजदार असतात. याचा अर्थ असा की कुत्र्यांच्या देखील एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीशी जोडण्याची मेंदूची प्रक्रिया असते.

Source link

budapest dogdog langugedog studydogspet animalsresearchसंशोधन
Comments (0)
Add Comment