Pin/Unpin चॅट फिचर कसं वापरायचं?
चॅट पिन केल्यामुळे महत्वाचे चॅट्स तुमच्या डोळ्यासमोर राहतात. त्यामुळे त्यांना अॅक्सेस करणे सोपं होऊन जातं. परंतु कधीकधी पिन केलेल्या चॅट्स अनावश्यक वाटू शकतात आणि काढून टाकावे लागू शकतात.
जर तुम्हाला एखादं चॅट पिन करायचं असेल तर तुम्हाला व्हॉट्सअॅप ओपन करून चॅट सेक्शनमध्ये जावं लागेल. ज्याचा पर्याय तुम्हाला बॉटम स्क्रीनवर मिळेल. त्यानंतर ती चॅट शोधा जी तुम्हाला पिन करायची आहे, त्या चॅटवर लॉन्ग प्रेस करून ‘पिन चॅट’ ऑप्शनवर क्लिक करा. ही प्रोसेस झाली की ते चॅटिंग तुमच्या चॅट लिस्टच्या टॉपवर पिन होईल.
जर तुम्हाला चॅट unpin करायचं असेल तर सर्वप्रथम व्हॉट्सअॅप ओपन करावं लागेल. त्यानंतर जे पिन चॅटिंग अनपिन करायचं आहे त्यावर लॉन्ग प्रेस करा. लॉन्ग प्रेस केल्यानंतर समोर एक मेन्यू येईल त्यातील ‘Unpin Chat’ ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे तुमचं ते चॅटिंग अनपिन होईल.
मीडिया रिजोल्यूशन आधीच ठरवता येणार
WhatsApp चे नवीन मीडिया फीचर WhatsApp अपडेट ट्रॅकर WABetaInfo नं अँड्रॉइड २.२४.७.१७ बिल्डसाठी व्हॉट्सअॅप बीटा मध्ये पाहिला होता. Android साठी बीटा व्हर्जन सोमवारी Google Play बीटा प्रोग्रामच्या माध्यमातून टेस्टर्ससाठी रिलीज करण्यात आला होता. नवीन अपडेट युजर्सना सेटिंग्सच्या माध्यमातून थेट फोटो आणि व्हिडीओची अपलोड क्वॉलिटी सेट करण्यास मदत करेल, त्यामुळे प्रत्येकवेळी नवीन मीडिया अपलोड करताना एचडी मीडिया ऑप्शन निवडावा लागणार नाही.