सावधान! मतदार ओळखपत्राबाबत ही चूक केल्यास होईल तब्बल एका वर्षाचा तुरुंगवास, जाणून घ्या योग्य प्रक्रिया

देशभरात निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. असे असतांना अनेकांची मतदार ओळखपत्र काढण्यासाठी लगबग सुरू आहे. मात्र हे मतदान ओळखपत्र काढतांना ही चूक झाल्यास तुम्हाला तब्बल एक वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. यापासून बचाव करण्यासाठी ही माहिती असणे आवश्यक आहे.

मतदार ओळखपत्रामुळे देशातील नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळतो. पण कशी काळी हे ओळखपत्र तयार करतांना काही चुका झाल्यास तुम्हाला एका वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. आज आपण मतदार ओळखपत्र बनवतांना कोणती काळजी घ्यावी याविषयी जाणून घेणार आहोत. यामध्ये तुम्ही मतदार ओळखपत्राची स्थिती ऑनलाइन कशी तपासू शकता आणि ते सरेंडर करण्याची ऑनलाइन प्रक्रिया काय आहे ते जाणून घेणार आहोत.

तर होईल तुरुंगवास..

मतदार ओळखपत्र हा एक आवश्यक सरकारी दस्तऐवज आहे. नागरिकांना मतदानात सहभागी करुन घेण्यासाठी हे ओळखपत्र अनिवार्य असते. पण २ किंवा त्यापेक्षा अधिक मतदार ओळखपत्र बाळगल्यास तुम्हाला तुरुंगवास भोगावा लागू शकतो. कारण मतदार यादीत एकापेक्षा जास्तवेळी मतदार म्हणून नोदणी केल्यास तो एक गुन्हा धरला जातो.

सरेंडर कसे करावे

एकव्यक्तीकडे दोनपेक्षा अधिक ओळखपत्र किंवा दोन मतदार यांद्यांमध्ये नाव असल्यास हे रद्द करण्यासाठी तुम्हाला फॉर्म ७ भरणे गरजेचे आहे. ही प्रोसेस तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने भरू शकतात. सर्व माहिती योग्य भरल्यास तुम्हाला काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.

ऑनलाइन स्टेटस तपासणे

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर तुम्हाला ओळखपत्रा सबंधित आवश्यक माहीती मिळू शकते. तसेच नवीन ओळखपत्रासाठी अर्ज करणे देखील तुम्हाला शक्य आहे. सध्याच्या कालावधीत मतदारांना ओळखपत्र काढण्यास एक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तुम्ही ऑनलाईन तक्रार नोंदवत तुमचे काम तुम्हाला मार्गी लावता येईल.

Source link

election commissiononline processvoter id cardvoter id jailvoter identificationvoter registrationvoting rightsनागरिकांना मतदानाचा अधिकार
Comments (0)
Add Comment