YouTubeने जोडली AIशी नाळ, आता आवडीच्या भागासाठी पूर्ण व्हिडीओ बघण्याची गरज नाही, पाहा काय आहे नवीन फिचर

जगभरात व्हिडीओ एंटरटेनमेंट प्लेटफॉर्म म्हणून यूट्यूबचा सर्वाधिक वापर करण्यात येतो. यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार युट्यूब वेळोवेळी अपडेट घेऊन आले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने, यूट्यूब आता लवकरच ‘जंप अहेड’ हे ऑप्शन घेऊन येणार आहे. या फिचरच्या मदतीने वापरकर्ते आपल्या आवडीप्रमाणे मजेशीर व्हिडीओ पाहू शकतात. म्हणजेच मनोरजांसाठी युजर्सला आता पूर्ण व्हिडीओ बघण्याची गरज नाही. या ऑप्शनवर टॅप केल्यास थेट मनोरंजक भागावर व्हीडीओ जाईल. ज्यांना पूर्ण व्हिडीओ बघण्याचा कंटाळा येतो त्या लोकांसाठी हे फीचर फायदेशीर ठरणार आहे.

युट्यूब व्हिडीओ फॉरवर्ड करण्यासाठी स्क्रीनवर दोनवेळा टॅप करावे लागते मात्र आता या पद्धतीत आर्टीफिशियल इंटेलिजन्सची एंट्री होणार आहे. व्यक्तीच्या आवडीला ट्रॅक करुन व्हिडीओतील मनोरंजक भागांबद्दल अंदाज लावला जाईल. युजर्सनी या फिचरला सपोर्ट करणाऱ्या व्हिडिओवर डबल टॅप केल्यस त्यांना ‘जंप अहेड’ हे ऑप्शन दिसणार आहे. नेहमीप्रमाणे १० सेकंड पुढे जाण्याऐवजी तुम्ही हे बटण दाबल्यास थेट व्हिडीओतील रंजक भागांकडे हा व्हिडिओ जाईल.

अनेकदा एखादी महत्त्वाची बातमी किंवा दृश्य मोठ्या कालावधीचे असते त्यातून आवश्यक भाग शोधणे अतिशय अवघड जाते. पण, या फिचरच्या मदतीने त्या माहितीपर्यंत तुम्हाला सहज पोहोचता येईल आणि मनोरंजक भाग तुम्हाला शोधून बघण्याची गरज नाही.

क्रिएटर्ससाठी देखील फायदेशीर

केवळ दर्शकांसाठीच नाही तर व्हिडिओ क्रिएटर्स या फीचरचा फायदा होणार आहे. जेव्हा लोक व्हिडिओ पाहताना “जंप अहेड” हे फिचर वापरातील, तेव्हा YouTube ला माहिती असते की व्हिडिओचे कोणते भाग सर्वात जास्त पसंत केले जात आहेत. या माहितीच्या आधारे व्हिडिओ बनवणाऱ्यांना समजू शकते की लोकांना काय आवडते आणि काय नाही. यामुळे लोकांच्या आवडीनुसार व्हिडीओ तयार करणे शक्य होईल. “जंप अहेड” फिचरची चाचणी अंतिम टप्प्यात आहे आणि सध्या ते फक्त यूएस मधील YouTube प्रीमियम सदस्यांसाठी उपलब्ध आहे.

Source link

youtubeyoutube aiyoutube jump aheadyoutube updateyoutube with aiएंटरटेनमेंटव्हिडीओ
Comments (0)
Add Comment