Realme 12x 5G चे स्पेसिफिकेशन्स
रियलमी १२एक्स ५जी फोन १०८० x २४०० पिक्सल रिजॉल्यूशन असलेल्या ६.७२ इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. ही पंच-होल स्टाइल स्क्रीन आहे जी आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे आणि १२०हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते तसेच ९५०निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करते.
Realme 12x अँड्रॉइड १४ सह लाँच झाला आहे आणि रियलमी युआय ५.० वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये ६नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डायमेन्सिटी ६१००+ ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो २.२गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो.
रियलमी १२एक्स ५जी फोन भारतात ८जीबी रॅमसह लाँच झाला आहे. हा स्मार्टफोन १२८जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून २टीबी पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये LPDDR4X RAM + UFS 2.2 Storage टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी रियलमी १२एक्स ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलसीडी फ्लॅशसह ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो २ मेगापिक्सल डेप्थ सेन्सरसह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Realme 12X 5G मध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.
रियलमी १२एक्स ५जी फोनमध्ये पावर बॅकअपसाठी ५,०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच ही बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये ४५वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळते. कंपनीचा दावा आहे की फक्त ३० मिनिटांत फोन ० ते ५०% पर्यंत चार्ज होऊ शकतो.
रियलमी १२एक्स ५जी फोन Air Gesture फीचरसह येतो. याची थिकनेस ७.६९मिमी तर वजन १८८ ग्राम आहे. नवीन रियलमी फोनमध्ये आयपी५४ रेटिंग, ३.५mm जॅक आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह VC Cooling टेक्नॉलॉजी पण देण्यात आली आहे.