फेसबुक मेसेंजरमध्ये मेसेज कसे एडिट करावे
1. तुमच्या स्मार्टफोनवर फेसबुक मेसेंजर उघडा.
2. तुम्ही ज्या मित्राला चुकीचा मेसेज पाठवला आहे त्याची चॅट विंडो उघडा.
3. तुम्ही एडिट करू इच्छित असलेल्या मेसेजवर जास्त वेळ प्रेस करा.
4. आता तुम्हाला स्क्रीनवर अनेक ऑप्शन्स दिसतील, ज्यामध्ये तुम्हाला ‘एडिट’ ऑप्शन निवडावा लागेल.
5. यानंतर योग्य मेसेज लिहा आणि तो पुन्हा चेक करा.
6. सेंड बटणावर क्लिक करा.
7. आता एडिटेड मेसेज आपोआप पाठवला जाईल.
टाईम लिमिटनंतर नाही होत मेसेज एडिट
फेसबुक मेसेंजरचे एडिट फीचर व्हॉट्सॲप आणि टेलिग्राममध्ये आढळलेल्या एडिट फीचरसारखे काम करते. या ॲपमध्ये 15 मिनिटांत मेसेज एडिट करता येतात. वेळ मर्यादा पूर्ण झाल्यानंतर, मेसेज एडिट केला जाणार नाही.
गेल्या वर्षी जोडले गेमिंग फीचर
सोशल मीडिया ॲप Facebook ने गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये फेसबुक मेसेंजरमध्ये गेमिंग फीचर जोडले होते. त्याची खासियत म्हणजे यात युजर्सना व्हिडिओ कॉलिंगदरम्यान गेम खेळता येतो. याद्वारे ‘एक्सप्लोडिंग किटन्स अँड कार्ड वॉर्स’सारखे खेळ खेळता येतील.
कंपनीला विश्वास आहे की प्लॅटफॉर्ममध्ये गेमिंग फीचर सादर केल्याने युजर्समधील संवाद सुधारेल. यामुळे त्यांच्यातील नातेही घट्ट होईल. तसेच, हा अनुभव देखील चांगला असेल.