ICICI बँकेने दिलेल्या या सूचनांचे पालन न केल्यास होईल मोठे आर्थिक नुकसान, AIबाबतही व्यक्त केली भीती

ICICI बँकेने आपल्या युजर्सला सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी केलेल्या एका चुकीमुळे मोठे नुकसान होऊ शकते असे बँकेने म्हटले आहे. क्यूआर कोड आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) या दोन्ही गोष्टींचा गैरवापर करून तुमचे बँक खाते रिकामे केले जाऊ शकते.

ICIC बँकने सांगितल्यानुसार युजर्सला अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. एका चुकीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. यापासून बचाव होण्यासाठी बँकेने आपल्या ग्राहकांना काही टिप्स दिल्या आहेत. या टीप्सचे पालन केल्यास क्यूआर कोड आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस सबंधित गैरप्रकारापासून बचाव होईल.

बँकेने कोणता इशारा दिला?

ICICI बँकेने युजर्ससाठी नवीन सूचना जारी केल्या आहेत. युजर्सला एक लिंक पाठवण्यात येत आहे.
यावर क्लिक केल्यास तुमच्या स्मार्टफोन मधील सर्व माहिती हॅकर्सला मिळते. आतापर्यंत अनेक ग्राहकांचे या माध्यमातून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

असा होईल बचाव

बँकेने सांगितल्यानुसार या लिंकवरून कुठलेही ॲप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करू नका. असे केल्यास तुमच्या फोनमधील सर्व डेटा पास होऊ लागतो. तुमच्या मोबाईलवर कोणतेही ॲप डाउनलोड करतांना प्रथम त्याचे रिव्ह्यू जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कारण या एका चुकीमुळे तुमचा संवेदनशील डेटा सहज हाताळता येतो.

ॲप डाउनलोड करताना हे लक्षात ठेवा

या स्वतःचा बचाव करण्यासाठी, तुमच्या स्मार्टफोनवर अँटी-व्हायरस देखील डाउनलोड करू शकता. तसेच, कोणतेही ॲप इन्स्टॉल करता तेव्हा सर्वप्रथम तुम्ही खात्री करायला हवी की ते फक्त Google Play Store आणि App Store वरून डाउनलोड केले जावे. कारण या प्लेटफॉर्मवर उपलब्ध असलेले ॲप बारकाईने चेक केले जातात. ICICI बँकचे अधिकृत ॲप असल्यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही.

Source link

artificial intelligenceCybersecurityicici bankICICI Bank NewsICICI बँकQR Code
Comments (0)
Add Comment