भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर म्हणून जिओचा पहिला क्रमांक लागतो. मात्र, जानेवारीमध्ये एअरटेलने एकूण सक्रिय वापरकर्त्यांच्या बाबतीत जिओला पराभूत केले आहे. या महिन्यात एअरटेलने सर्वाधिक सक्रिय वापरकर्ते जोडले आहेत. एअरटेलने जानेवारी २०२४ मध्ये Jio पेक्षा अधिक सक्रिय मोबाइल वापरकर्ते जोडले आहेत. असे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच TRAIने त्यांच्या अहवालात म्हटले आहे. जानेवारी २०२४ मध्ये, Airtel ने ३५.५ लाख सक्रिय युजर्स जोडले आहेत, तर Jio ने ११ लाख सक्रिय वापरकर्ते जोडले आहेत. Vi ने १७ लाख सक्रिय युजर्स गमावले आहेत.
जिओच्या यूजर्समध्ये वाढ
जिओच्या सक्रिय युजर्समध्ये वाढ झाली आहे. जानेवारीमध्ये एअरटेलच्या ३८१.०९ दशलक्ष सक्रिय युजर्सची नोंद झाली आहे. तर जिओने या आकडेवारीत बाजी मारत ४२५.६१ दशलक्ष यूजर्सची नोंद केली आहे. यात मात्र Viच्या आकडेवारीत १९४.९६ घट झाली आहे.VIला मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत, Vi च्या एकूण वापरकर्त्यांची संख्या १.५२ दशलक्षने घटून २२१.५२ दशलक्ष झाली आहे.
सर्वाधिक मार्केट शेअर कोणाकडे आहे?
- जिओ – ३९.९७ टक्के
- एअरटेल – ३२.९३ टक्के
- Vi – १९.०९ टक्के
भारतातील एकूण ९८ टक्के मार्केट शेअर टॉप 5 टेलिकॉम ऑपरेटर्सकडे आहे. तर यावर्षी जानेवारी महिन्यात १.२ कोटी युजर्सने त्यांचे सिम पोर्ट केले आहे.जानेवारीमध्ये जिओने लँडलाइन सेगमेंटमध्ये आघाडीचे स्थान कायम ठेवले आहे.
कोणाचे युजर्स किती?
- जिओ – ४७४.६२ दशलक्ष
- भारती एअरटेल – २६७.२६ दशलक्ष
- व्होडाफोन आयडिया – १२६.७८ दशलक्ष
- बीएसएनएल – २५.०८ दशलक्ष
- एट्रिया – २.२३ दशलक्ष