‘शरद पवारांनी काँग्रेस सोडली नव्हती, त्यांना काढण्यात आलं होतं’

हायलाइट्स:

  • अनंत गीते यांच्या वक्तव्यावर उलटसुलट प्रतिक्रिया
  • रामदास आठवलेंनी गीतेंचं वक्तव्य ठरवलं अयोग्य
  • पवारांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला नव्हता – आठवले

मुंबई: शिवसेनेचे नेते व माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते (Anant Gite) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी गीते यांचा समाचार घेतल्यानंतर आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी या विषयावर भाष्य केलं आहे. गीते यांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य अयोग्य असल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे.

वाचा: राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री ठाकरेंनी दिलेल्या उत्तराची देशभर चर्चा; असं काय आहे पत्रात?

‘काँग्रेस, राष्ट्रवादी हे आपले पक्ष नाहीत. त्यांचं कधी एकमेकांशी पटलं नाही, त्यामुळं शिवसेनेशी पटण्याचा प्रश्नच नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. शरद पवार हे शिवसैनिकांचे गुरू होऊ शकत नाहीत,’ असं गीते यांनी म्हटलं होतं. यावर आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘शरद पवार हे सन्माननीय नेते आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस वगळता इतर कोणत्याही पक्षाचे नेते नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, ते महाराष्ट्राचे नेते आहेत. गीते यांचं पवारांबद्दलचं वक्तव्य योग्य नाही. शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष सोडला असं नाही, तर त्यांना काँग्रेसमधून बाहेर काढण्यात आलं. त्यामुळं पवारांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असं म्हणणं चुकीचं आहे,’ असं आठवले म्हणाले.

वाचा: मुंबई लोकल सर्वांसाठी कधी सुरू होणार; रावसाहेब दानवे म्हणाले…

गीते यांचं वक्तव्य अयोग्य ठरवतानाच आठवले यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा महायुतीमध्ये येण्याची साद घातली. ‘शिवसेनेचे नेते शरद पवारांवर इतका गंभीर आरोप करत असतील तर शिवसेनेनं राष्ट्रवादीसोबत राहूच नये. शिवसेनेनं पुन्हा स्वगृही परतावं. भाजप, आरपीआयसोबत मिळून बाळासाहेबांचं शिवशक्ती-भीमशक्तीचं स्वप्न साकार करावं,’ अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली. ‘उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद घ्यावं आणि अडीच वर्षे फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं,’ असा सत्तेचा फॉर्म्युलाही त्यांनी मांडला.

वाचा: अश्लील शिवीगाळीचे व्हिडिओ करायचा व्हायरल; पोलिसांनी ‘असा’ दिला दणका

Source link

Anant Giteramdas athawaleramdas athawale latest newsramdas athawale on sharad pawarSharad PawarSunil Tatkareअनंत गीतेरामदास आठवलेशरद पवारसुनील तटकरे
Comments (0)
Add Comment