आकाराने लहान
प्रॉमेट कंपनीचे हे चार्जर स्टँडर्ड मॅकबुक चार्जर टाइप सी पेक्षा 50% लहान आहे. लहान आकारामुळे या चार्जरला पोर्टेबल स्वरुप मिळते. २४ महिन्यांच्या वॉरंटीसह हे प्रोडक्ट अमेझॉन इंडियावर ३१९९ रुपये या किमतीत खरेदी करता येईल. चार्जरसह लाइटनिंग-फास्ट GaN चार्जर 65W आणि 60W PD केबल मिळतात. सामान्य सिलिकॉन केबलपेक्षा अधिक फास्ट चार्जिग स्पीड यामुळे मिळणार आहे. डिव्हाईस अत्यंत वेगाने चार्ज करण्याची क्षमता या चार्जारमध्ये आहे.
ओव्हरचार्जिंग आणि शॉर्ट-सर्किटपासून संरक्षण
पॉवरपोर्ट 65 हे चार्जर अतिशय सुरक्षित मानले जात आहे. वापरात असतांना चार्जर ओव्हरहीट होत नाही तसेच, कनेक्ट केलेले डिव्हाईस व त्याची क्षमता यानुसार कार्य करते. कुठल्याही धोक्याशिवाय डिव्हाइसेस चार्ज करण्यासाठी हे सर्वात उत्तम चार्जिंग सोल्यूशन आहे.
खालील डिव्हाइसेस चार्ज करणे शक्य
लॅपटॉप(USBसी),स्मार्टफोन, iPhone, MacBook Air, iPad Pro व Pixel GalaxyPowerPort 65W हे एक ऑन इन वन चार्जिंग सोल्यूशन आहे.