विशेष म्हणजे एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही या फोनची किंमत आणखी कमी करू शकता. लक्षात असू द्या की एक्सचेंज मध्ये मिळणारा हा डिस्काउंट तुमच्या जुन्या फोनच्या कंडीशन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असेल. हा धमाकेदार सेल ७ एप्रिल पर्यंत चालेल.
मोटोरोला एज ४० नियो
१२जीबी रॅम आणि २५६जीबी इंटरनल स्टोरेज असेलेल्या या फोनची किंमत २४,९९९ रुपये आहे. सेलमध्ये तुम्ही हा २ हजार रुपयांच्या बँक डिस्काउंटसह विकत घेता येईल. या डिस्काउंटसाठी तुम्हाला एसबीआय, अॅक्सिस किंवा ICICI बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डनं पेमेंट करावं लागेल. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेच्या कार्ड होल्डर्सना कंपनी ५ टक्के कॅशबॅक देखील देत आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही फोनची किंमत २३,१०० रुपयांपर्यंत कमी करू शकता. फीचर्स पाहता वॉटर प्रोटेक्शनसह येणारा हा आयपी६८ रेटिंग असलेला सर्वात हलका फोन आहे. याचा डिस्प्ले १४४हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे एलडी फ्लॅशसह दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील ५० मेगापिक्सलच्या मेन लेन्ससह एक १३ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तसेच, सेल्फीसाठी कंपनीनं या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. प्रोसेसर पाहता फोन मीडियाटेक डायमेन्सिटी ७०३० चिपसेटवर चालतो. फोनची बॅटरी ५०००एमएएचची आहे, जी ६८ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
मोटोरोला जी८४ ५जी
१२जीबी रॅम आणि २५६जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत १७,९९९ रुपये आहे. बँक ऑफरमध्ये फोनवर तुम्ही १ हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळवू शकता. कंपनी फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डने पेमेंट करणाऱ्या युजर्सना ५ टक्के कॅशबॅक देखील देत आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही या फोनची किंमत १६,२५० रुपयांपर्यंत कमी करू शकता.
मोटोरोलाच्या या फोनमध्ये तुम्हाला ६.५५ इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले मिळेल. प्रोसेसर म्हणून फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ६९५ चिपसेट देण्यात आला आहे. फोनच्या मागे ५० मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी यात तुम्हाला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल.