ComfyAir कंपनीचे हे एक लहान एसी युनिट आहे ज्यात खोलीला थंड आणि गरम करण्याची क्षमता आहे. घरातील खास लहान जागांसाठी हे डिजाईन करण्यात आले आहे. लहान खिडकीत हा एसी सहज बसवता येतो व कमी जागा लागते. यासोबतच यात दोनप्रकारे विंड स्पीड सेट करता येईल. ज्यात १६ ते ३० डिग्री सेल्सियस दरम्यान तापमान ठेवता येईल.
३ मॉडेल्समध्ये उपलब्ध
ComfyAir कंपनीचा हा पोर्टेबल एसी रिमोट किंवा बिल्ट इन बटणाने सहज नियंत्रित करता येतो. BTUमध्ये या प्रोडक्टची क्षमता मोजण्यात येते. BTU म्हणजे भारतात ज्याप्रमाणे टन्समध्ये एसीची क्षमता मोजली जाते तसेच, BTUचा फुलफॉर्म ब्रिटिश थर्मल युनिट आहे. म्हणजे 12000 BTU एक टन.
हा एसी तीन मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे – ComfyAir 3000, ComfyAir 6000 आणि ComfyAir 9000. म्हणजे एक टनापेक्षा एसीची क्षमता कमी असते. ComfyAir 3000 मध्ये 880W कुलींग आणि 600W हीटिंग पॉवर आहे, ComfyAir 6000 मध्ये 1,758W कुलींग आणि 1,500W हीटिंग पॉवर आहे आणि ComfyAir 9000 मध्ये 2,637W कुलींग आणि 1,500W हीटिंग पॉवर आहे. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही या मॉडेलची निवड करू शकतात.
किंमतही खिशाला परवडणारी
ComfyAir 3000 window AC ची किंमत 19 डॉलर (16 हजार रुपये) आहे. ComfyAir 6000 आणि 9000 मॉडेल्सची किंमत 229 डॉलर्स (रु. 18,732) आणि 249 डॉलर्स (रु. 20,368) आहे.