फायबर बेसिक OTT 599
599 रुपयांच्या प्लॅनचे नाव ‘फायबर बेसिक OTT 599’ आहे, जे युजर्सना 75Mbps स्पीडसह 4,000GB (4TB) पर्यंत डेटा देते. एकूण डेटा कोटा संपल्यानंतर, युजर्स 4Mbps च्या स्पीडसह संपूर्ण महिना ब्राउझ आणि डाउनलोड करू शकतील. या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर लोकल आणि नॅशनल कॉलिंग पूर्णपणे मोफत आहे. योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे OTT प्लॅटफॉर्मवर फ्री एन्ट्री, ज्यामध्ये युजर्स Disney + Hotstar सुपर प्लॅनचा आनंद घेऊ शकतात. वास्तविक, टेलीकॉम ऑपरेटर आधीच 599 रुपयांचा बेसिक प्लस प्लॅन ऑफर करत आहे, ज्याची किंमत नवीन प्लॅन सारखीच आहे. तथापि, या प्लॅनमध्ये OTT सबस्क्रिप्शन उपलब्ध नाही, परंतु स्पीड मात्र 100Mbps आहे. दोन्ही प्लॅनचे इतर सर्व फायदे समान आहेत.
फायबर बेसिक प्लस OTT 699
नवीन प्लॅनमधील दुसरा प्लॅन म्हणजे 699 रुपयांचा ‘फायबर बेसिक प्लस OTT 699’, जो 100Mbps स्पीड आणि 4,000GB डेटा ऑफर करतो. डेटा कोटा संपल्यानंतर,युजर्स 4Mbps च्या वेगाने डाउनलोड करू शकतात. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगचाही फायदा मिळतो. मात्र, कंपनीने एकाच प्लॅनचे दोन भाग केले आहेत. फायबर बेसिक प्लस ओटीटी 699 प्लॅन डिस्ने+हॉटस्टार, हंगामा, शेमारू, लायन्सगेट आणि एपिकॉनचे सबस्क्रिप्शन ऑफर करते, तर ‘फायबर बेसिक प्लस ओटीटी पीके2 699’ नावाची योजना समान स्पीड, डेटा आणि कॉलिंगचे फायदे देते, परंतु YuppTV पॅक (Zee5 प्रीमियम, SonyLivPremium) , YuppTV)मेंबरशीप त्यात उपलब्ध आहे. युजर्स त्यांच्या आवडत्या OTT प्लॅटफॉर्मनुसार योजना निवडू शकतात.कंपनीच्या लिस्टमध्ये 699 रुपयांचा फायबर बेसिक सुपर 699 प्लॅन आधीपासूनच आहे, जो कोणत्याही प्रकारचा फ्री ओटीटी ऍक्सेस देत नाही, परंतु तो 125Mbps स्पीड ऑफर करतो आणि डेटा कोटा संपल्यानंतर, स्पीड 8Mbps वर राहतो. .
राज्यांनुसार विविध योजना
BSNL च्या सर्व योजना कंपनीच्या वेबसाइटवर लिस्टेड केलेल्या आहेत. तथापि, योजनांची उपलब्धता राज्यांनुसार बदलते.