Chandrakant Khaire: जन आशीर्वाद यात्रेसाठी पैसा आला कुठून?; खैरेंचा भाजपला थेट इशारा

हायलाइट्स:

  • शिवसेना आणि भाजपमधील तणाव वाढला.
  • शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा थेट इशारा.
  • जन आशीर्वाद यात्रेसाठी पैसा आला कुठून?

लातूर: राज्यात सरकार स्थापन करता आलं नाही म्हणून भाजपचा जळफळाट होतो आहे. यातूनच मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपकडून आरोप करण्यात येत आहेत, असे सांगताना शिवसेना असे आरोप खपवून घेणार नाही, असा इशारा शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिला. ( Chandrakant Khaire On Jan Ashirwad Yatra )

वाचा: मी भला, माझे काम भले!; ‘त्या’ आरोपांवर अजित पवारांनी बोलणे टाळले

केंद्रात नव्याने वर्णी लागलेल्या मंत्र्यांनी जन आशीर्वाद यात्रा काढली. ही यात्रा काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला चार-साडेचार कोटी रुपये दिले गेले. भले मोठे बॅनर-होर्डिंग लावण्यात आले. हा पैसा आला कुठून? असा सवाल करत, आम्हाला भाजपची कुंडली काढावी लागेल, असा इशाराही चंद्रकांत खैरे यांनी दिला.

वाचा: ‘पवारांवरील निष्ठेपोटी संजय राऊत शिवसेनेचं मोठं नुकसान करताहेत’

लातूरमध्ये शिवसेनेच्या आढावा बैठकीसाठी खैरे आले होते. भाजप नेते किरीट सोमय्या हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करताना दिसून येत आहेत. या संदर्भात विचारले असता खैरे म्हणाले, ‘सरकार स्थापन करता आले नाही म्हणून त्यांचा जळफळाट चालला आहे. त्यामुळेच किरीट सोमय्या यांना टीका करण्यासाठी सोडलं आहे. त्यांना मी लोकसभेत शक्ती कपूर असं नाव दिलं होतं. ते तंतोतंत खरं आहे. असल्या लोकांकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लक्ष देत नाहीत. ती खूप साधी सरळ व्यक्ती आहे.’ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून चांगले काम करीत आहेत. कोविड काळात त्यांनी केलेल्या नियोजनामुळेच अनेकांचे प्राण वाचले आहेत, असे सांगताना आमच्यावर कोणी निराधार आरोप करत असेल तर शिवसेना हे खपवून घेणार नाही, असे खैरे यांनी भाजप नेत्यांना ठणकावले.

वाचा:राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री ठाकरेंनी दिलेल्या उत्तराची देशभर चर्चा; असं काय आहे पत्रात?

दरम्यान, गेल्या काही काळापासून शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान थेट मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वादळ उठले. त्यातून राणे यांना अटकेच्या कारवाईला सामोरे जावे लागले. त्यापाठोपाठ आता किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर घोटाळ्यांच्या आरोपांची मालिकाच लावली आहे. यात ठाकरे कुटुंबालाही लक्ष्य करण्यात येत असल्याने शिवसैनिक आक्रमक झाले असून खैरे यांनी तर भाजपला जशासतसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे.

वाचा: किरीट सोमय्यांवरील कारवाई नक्की कुणाच्या आदेशाने?; वळसे म्हणाले…

Source link

chandrakant khaire latest newschandrakant khaire on jan ashirwad yatrachandrakant khaire on kirit somaiyachandrakant khaire targets bjpshiv sena vs bjp latest newsउद्धव ठाकरेकिरीट सोमय्याचंद्रकांत खैरेजन आशीर्वाद यात्राशिवसेना
Comments (0)
Add Comment