एक महिना वाढीव रिचार्जचा कंपन्यांना फायदा
टेलिकॉम कंपन्या तीन प्रकारचे प्लॅन आणतात, एक 28 दिवसांसाठी, दुसरा 56 दिवसांसाठी आणि तिसरा 84 दिवसांसाठी. यामागचे कारण म्हणजे कंपन्या दर महिन्याला रिचार्ज करून अधिक कमाई करतात. समजा तुम्ही दर महिन्याला 28 दिवस रिचार्ज केले तरअशा परिस्थितीत तुम्ही वर्षभरात 12 महिन्यांऐवजी 13 महिन्यांसाठी रिचार्ज करता.
पूर्वी देत असत ३० दिवसांचा प्लॅन
कंपन्या केवळ 28 दिवसांसाठीच प्लॅन ऑफर करतात असे नेहमीच नाही. पूर्वी योजना ३० दिवसांसाठी यायची. पण नंतर कंपन्यांनी अधिक कमाईची कल्पना मांडली आणि ग्राहकांनाही त्याने फारसा फरक पडला नसल्याने हि योजना पुढे सुरु राहिली.
ट्रायने केला हस्तक्षेप
नंतर प्रश्न उपस्थित केले गेले कारण कंपन्या या 28 दिवसांच्या योजनांना मासिक प्लॅन म्हणून विकत असत. त्यानंतर ट्रायने (Telecom Regulatory Authority of India) हस्तक्षेप केला. त्यांनी कंपन्यांना निर्देश दिले होते की, जर त्यांनी मासिक योजनेच्या श्रेणीमध्ये याचा समावेश केला तर त्यांना 30 दिवसांची व्हॅलिडिटी द्यावी लागेल. परंतु, याचा कोणताही मोठा परिणाम दिसला नाही. परंतु आता मात्र कंपन्या मासिक योजनांमध्ये या योजनांचा समावेश करत नाहीत.