‘किरीट सोमय्या यांनी यापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते भाजपमध्ये कसे?’

हायलाइट्स:

  • किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडीतील नेत्यांविरोधात आरोपांची राळ
  • राष्ट्रवादीकडून किरीट सोमय्या आणि भाजपला खरमरीत सवाल
  • महाविकास आघाडी सरकार मजबूत असल्याचाही पुनरुच्चार

मुंबई : भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांविरोधात आरोपांची राळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे अनेक नेते सोमय्या यांच्या निशाण्यावर आहेत. मात्र अशातच आता राष्ट्रवादीकडून किरीट सोमय्या आणि भाजपला खरमरीत सवाल विचारण्यात आला आहे.

‘किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले कृपाशंकर सिंह, नारायण राणे, विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते हे भाजपात आहेत, याचा अर्थ काय समजायचा? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी किरीट सोमय्या यांना केला आहे.

Uddhav Thackeray: CM ठाकरे-अमित शहा यांची दिल्लीत होणार भेट!; तर्कवितर्कांना उधाण

‘आजकाल किरीट सोमय्या यांनी उठसूठ मविआच्या मंत्र्यांवर, नेत्यांवर आरोप करण्याची मालिका सुरू केली आहे. लोकशाहीमध्ये पारदर्शक कारभार केला पाहिजे. ज्यांच्यावर किरीट सोमय्या यांनी आरोप केले ते सर्व नेते आज भाजपात आहेत. तसंच छगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदन प्रकरणी आरोप केले होते मात्र त्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे हेही लक्षात घ्या,’ असंही महेश तपासे म्हणाले.

‘महाविकास आघाडीच पुन्हा येणार…’

‘आरोप करायचे तर करा. तुमचं काम आरोप करणं हे आहे. आमचं काम महाराष्ट्राची सेवा करायचं आहे. महाविकास आघाडी सरकार मजबूत असून २०२४ चा कार्यकाल पूर्ण करेल आणि भविष्यातही निवडून येईल,’ असा विश्वासही राष्ट्रवादीच्या महेश तपासे यांनी व्यक्त केला आहे.

Source link

bjpKirit Somaiyamahavikas aaghadiकिरीट सोमय्यामहाविकास आघाडी
Comments (0)
Add Comment