आजचे पंचांग 4 एप्रिल 2024: तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

राष्ट्रीय मिति चैत्र १५, शक संवत १९४६, चैत्र कृष्ण दशमी, गुरूवार, विक्रम संवत २०८० सौर चैत्र मास प्रविष्टे २२, रमाजान २४, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ४ एप्रिल २०२४. सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, वसंत ऋत. राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत.

दशमी तिथी संध्याकाळी ४ वाजून १५ मिनिटांपर्यंत त्यानंतर एकादशी तिथी प्रारंभ, श्रवण नक्षत्र रात्री ८ वाजून १२ मिनिटांपर्यंत त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र प्रारंभ. सिद्ध योग दुपारी १ वाजून १५ मिनिटांपर्यंत त्यानंतर साध्य योग प्रारंभ. विष्टी करण संध्याकाळी ४ वाजून १५ मिनिटांपर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ. चंद्र दिवस-रात्र मकर राशीत भ्रमण करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-३२
  • सूर्यास्त: सायं. ६-५२
  • चंद्रोदय: पहाटे ३-०७
  • चंद्रास्त: दुपारी २-२७
  • पूर्ण भरती: सकाळी ७-४२ पाण्याची उंची २.९४ मीटर, रात्री ९-०६ पाण्याची उंची ३.८३ मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे २-१९ पाण्याची उंची २.३० मीटर, दुपारी १-५१ पाण्याची उंची १.३३ मीटर

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३७ मिनिटे ते ५ वाजून २२ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून २० मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून १ मिनिटांपासून १२ वाजून ४६ मिनिटांपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ३ मिनिटांपर्यंत.अमृत काळ सकाळी ६ वाजून ८ मिनिटे ते ७ वाजून ४१ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत. सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी सहा ते साडे सात वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी १० वाजून १९ मिनिटांपासून ते ११ वाजून ९ मिनिटांपर्यंत. त्यानंतर दुपारी ३ वाजून २० मिनिटांपासून ते ४ वाजून १० मिनिटांपर्यंत. भद्राकाळ सकाळी ६ वाजून ७ मिनिटे ते ४ वाजून १४ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय – भगवान विष्णु यांना चण्याची डाळ आणि हळकुंड अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

4 April 2024marathi panchangsunrisesunsetअशुभ मुर्हूतआजचे पंचांगनक्षत्रराहुकालशुभ मुर्हूत
Comments (0)
Add Comment