supriya sule at ajanta and ellora caves: ऐतिहासिक अजिंठा, वेरूळ लेण्यांच्या सौंदर्याने हरखून गेल्या खासदार सुप्रिया सुळे

औरंगाबाद: जागतिक वारसा स्थान असलेल्या जगप्रसिद्ध अजिंठा लेणी, तसेच वेरूळ लेण्यांच्या सौंदर्याने सौंदर्य आणि कलाप्रेमींना नेहमीच भुरळ घातली आहे. येथील कलेचा अविष्कार पाहताना पाहणारा हरवून जात नाही असे होत नाही. मग तो कलाकार असो, सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा कायम कामाच्या व्यापात गुंतलेला राजकारणी असो… अगदी हाच प्रत्यय राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनाही आला. येथील कलाविष्काराने आणि सौंदर्याने खासदार सुळे यांना भुरळ घातली नसती तरच नवल. ही जगप्रसिद्ध कला आणि सौंदर्य पाहून त्या हरखून गेल्या. येथील कलेचा अविष्कार पाहिल्यानंतर हा आनंद लोकांना सांगण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. अनेक सुंदर असे फोटो ट्विट करत त्यांनी या जगप्रसिद्ध सौंदर्याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.

जगप्रसिद्ध अजिंठा लेण्या या जागतिक वारसास्थान तर आहेतच, पण याबरोबर त्यांचा महाराष्ट्रातील आश्चर्यांमध्येही गणना होते. या लेण्यांचं सौंदर्य पाहून खासदार सुप्रिया सुळे अवाक् झाल्या. या लेण्यांमधील चित्रकला अद्भूत आहे. भारतीय चित्रकलेचा हा अतिशय सुंदर अविष्कार असून हा देशाचा अतिशय उज्ज्वल असा वारसा आहे, असा शब्दात सुळे यांनी या लेण्यांचा गौरव केला आहे.

लेण्यांचं सौंदर्य पाहून खासदार सुप्रिया सुळे अवाक् झाल्या.

क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्र्यांनी ‘त्या’ प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी: आशीष शेलार

जगप्रसिद्ध अजिंठा लेण्या या वाकाटक, चालुक्य आणि राष्ट्रकुल काळात निर्माण झाल्या आहेत. त्यांच्यातील स्थापत्यकला, शिल्पकला आणि चित्रकला जगप्रसिद्धच आहे. हे ठिकाण बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे देशातूनच नाही, जर जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक भेटी देऊन तृप्त होत असतात.

खासदार सुप्रिया सुळे यांनी लेण्यांचे सौंदर्य न्याहाळले.

सुप्रिया सुळे यांना वेरूळच्या लेण्यांनीही अशीच भुरळ घातली. वेरुळची लेणी म्हणजे कलेचा अद्भुत अविष्कार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. येथील कैलास मंदिर तर कोणाच्याही मनाचा ठाव घेईल असेच आहे. खासदार सुळे या कैलास मंदिराचे काम पाहून थक्कच झाल्या. त्या म्हणाल्या की, ‘या लेण्यांतील कैलास मंदिराचे काम पाहून मन थक्क होते. या लेण्यांमध्ये विविध शैलींचा अविष्कार पहायला मिळाला.’

क्लिक करा आणि वाचा- राणेंचा बंगला अनधिकृत असेल तर तो पाडायला मुख्यमंत्री घाबरतात का?; सोमय्यांचा सवाल

वेरूळ येथील कैलास मंदिराने सुप्रिया सुळेंना घातली भुरळ

ऐतिहासिक दौलताबाद किल्ल्यालाही दिली भेट

खासदार सुळे यांनी दौलताबादच्या किल्ल्यालाही भेट दिली.शतकांपूर्वी उभारलेला हा किल्ला आजही भक्कम वाटतो. अनेक ऐतिहासिक संदर्भ या किल्ल्याशी जोडलेले आहेत. हा प्रेरणादायी इतिहास जाणून घेतला, असे ट्विट त्यांनी केले आहे.

दौलताबादचा किल्ला (देवगिरी किल्ला)

राष्ट्रकुट राज्यातील र्शीवल्लभ याने इ.स. ७५६ ते ७७२ या काळात हा किल्ला बांधला असा इतिहास आहे. हा ऐतिहासिक किल्ला रामदेवराव यादवांपासून ते निझामशाहीपर्यंत अनेक राजांच्या कतृत्वाचा साक्षीदार आहे. दौलताबादचा हा किल्ला औरंगबादपासून १५ किलोमीटरच्या अंतरावर आहे. या किल्ल्याचे मूळ नाव देवगिरी असे आहे.

क्लिक करा आणि वाचा- मनसेचे खळ्ळ-खट्याक; संतप्त कार्यकर्त्यांनी भिवंडी-ठाणे मार्गावरील टोल नाका फोडला

दौलताबाद किल्ल्यावरील तोफ

देवगिरीच्या किल्ल्याचा महाराष्ट्रातील ७ आश्चर्यांमध्ये समावेश आहे. २८ नोव्हेंबर १९५२ साली या किल्ल्याला राष्ट्रीय संरक्षित स्मारक घोषित करण्यात आले आहे.

खासदार सुप्रिया सुळे ऐतिहासिक दौलताबाद किल्ल्यावर

Source link

ajintha cavesmp supriya suleverul cavesअजिंठा लेणीकैलास मंदिरखासदार सुप्रिया सुळेदेवगिरीचा किल्लादौलताबाद किल्लावेरूळ लेणी
Comments (0)
Add Comment