Apple कंपनी सुरुवातीपासूनच आपल्या दर्जेदार बिल्ट क्वालिटी व सिक्युरिटी फिचर्ससाठी ओळखली जाते. कंपनीचे सर्व डीवाइसेस मॅकबूक, आयपॅड व नुकत्याच लाँच झालेल्या व्हिजन प्रो हेडसेटबद्दल सूचना जारी करण्यात आली आहे. माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, भारताच्या सायबर सिक्युरिटी एजन्सीने (इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) सूचना दिली आहे की ऍपलच्या डीवाइसेस ‘रिमोट कोड एक्झिक्युशन व्हलनरेबिलिटी’चा वापर करून हॅकर्स सहज निशाणा करू शकतात. यामुळे सॉफ्टवेअर तसेच हार्डवेअरवर देखील मोठा परिणाम होऊ शकतो. हॅकर्सला एखाद्या रिमोट कंट्रोलप्रमाणे दूरच्या अंतरावरुन डिवाईस हाताळता येते.
CERT-In ने सांगितल्यानुसार, IOS १७.४.१, IPhones, IPads आणि IOS १६.७.७ अपडेटेड डीवाईसेस धोका असणार आहे. iPhone ८, iPhone ८ Plus, iPhone सारख्या डीवाईसेसमध्ये हे वर्जन उपलब्ध आहे. तसेच, हे वर्जन्स macOS Monterey आणि macOS Ventura वर देखील उपलब्ध आहेत.
अशा प्रकारे डिवाईस ठेवा सिक्युअर
‘रिमोट कोड एक्झिक्युशन व्हलनरेबिलिटी’चा वापर करून होणाऱ्या हॅकिंगपासून वाचण्यासाठी. तुमचे Apple नेहमी अपडेटेड असणे आवश्यक आहे. तसेच तुमच्या डिवाइस मधील सिक्युरिटी पॅच देखील अपडेटेड असायला हवा. जेव्हा तुम्ही वाय-फाय नेटवर्कशी कनेक्ट करता तेव्हा कनेक्शन सिक्युअर असल्याची खात्री करा. सार्वजनिक वाय-फायचा वापर करावा. या दोन गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या डेटाचा बॅकअप घ्यायला विसरू नका जेणेकरून ते हॅक करता येणार नाही.