कम्युनिटी नोट्स भारतात लॉन्च
एक्सचे अफिलिएट हँडल कम्युनिटी नोट्स गुरुवारी भारतात लॉन्च करण्यात आले. या नवीन फॅक्ट चेकिंग प्लॅटफॉर्मचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.ट्विटरवर शेअर होणाऱ्या माहितीचे फॅक्ट चेकिंग होणे अतिशय गरजेचे होते कारण, यामुळे अनेक गैरप्रकारांना चालना मिळत होती.या गोष्टी कंपनीच्या कधीपासून लक्षात आल्या आहेत. यामुळे यावर ठोस कारवाई करत ट्विटरने तोडगा काढला आहे.
खोट्या माहितीचा थांबेल प्रसार
Xने सांगितल्यानुसार कम्युनिटी नोट्सच्या माध्यमातून विविध क्षेत्रातले लेखक एकत्र येत माहितीची तपासणी करतील. यामुळे माहिती चुकीची आढळल्यास त्यावर रेटिंग देण्यात येईल. यामुळे विशिष्ट विचारसरणीतून वपोस्ट व्हायरल होतात यामुळे सामाजिक अस्थिरता निर्माण होते. जगभरात अशी प्रकरणे बघायला मिळाली आहेत. यावर आळा घालण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.
कम्युनिटी नोट्सचे उद्दिष्ट
X च्या मते, कम्युनिटी नोट्सचे प्रमुख उद्दिष्ट्य वापरकर्त्यांना मदत करणे हे आहे. तसेच, कंपनीच्या म्हणण्यानुसार, जगभरातील ६९ देशांतील विविध लोक कम्युनिटी नोट्सशी जोडले गेले आहेत, ही लोकं योग्य वस्तुस्थिती तपासण्यात मदत करतात. एवढेच नाही तर कम्युनिटी नोट्समध्ये योगदान देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
आगामी निवडणूक काळात फायदेशीर
कम्युनिटी नोट्स हे आगामी निवडणूक काळात कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. कारण, यामुळे प्रसारित होणाऱ्या चुकीच्या व खोट्या माहितीवर रोख बसेल. चुकीच्या माहीतीला उत्तर देत कम्युनिटी नोट्स सत्यता समोर आणू शकतात.