Amazon Prime Video च्या फ्री सबस्क्रिप्शनसह Jio ने लॉन्च केला नवीन प्लॅन; जाणून घ्या फीचर्स व किंमत

Jio ने त्याच्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये एक नवीन प्लॅन जोडला आहे. या प्लॅनची किंमत 857 रुपये आहे. हा प्लॅन युजर्सना लॉंग व्हॅलिडिटीसह डेटा, कॉलिंग आणि OTT सारखे फायदे प्रदान करते. जर तुम्ही जिओचे ग्राहक असाल आणि लॉंग व्हॅलिडिटी, डेटा, कॉलिंग आणि OTT फायद्यांसह सुसज्ज योजना शोधत असाल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो. Jio च्या या नवीन प्लॅनशी संबंधित सर्व तपशील जाणून घेऊया.

रिलायन्स जिओचा 857 रुपयांचा आकर्षक रिचार्ज प्लॅन

Jio कंपनीने 857 रुपयांचा नवा प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 84 दिवसांपर्यंत आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 2GB डेटाची सुविधा मिळेल. 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीनुसार, तुम्हाला प्लॅनमध्ये 168GB डेटाचा प्रवेश मिळेल. दैनंदिन डेटा कोटा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग 64 Kbps पर्यंत कमी होतो.याशिवाय प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देखील उपलब्ध आहे. युजर्स 84 दिवस कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा आनंद घेऊ शकतात. याचबरोबर प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत एसएमएसची सुविधाही देण्यात आली आहे. केवळ डेटा, कॉलिंग आणि एसएमएस फायदेच नाही तर जिओच्या या नवीन प्लॅनमध्ये ग्राहकांच्या मनोरंजनाचीही पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये यूजर्ससाठी ‘Amazon Prime Video Mobile Edition’ चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. हे सबस्क्रिप्शन युजर्ससाठी पूर्ण 84 दिवसांसाठी उपलब्ध असेल. यासोबतच JioTV, JioCinema आणि JioCloud सुविधांचाही प्लॅनमध्ये समावेश करण्यात आला आहे. मनोरंजनाच्या ऑप्शन्स व्यतिरिक्त, Jio ग्राहकांना या प्लॅनसह 5G वेलकम ऑफर देखील मिळेल.

JioBharat 234 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

Jio कंपनीने यापूर्वी JioPhone ग्राहकांसाठी 234 रुपयांचा नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे. हा बजेट-फ्रेंडली प्लॅन 56 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 0.5GB डेटा मिळतो. याव्यतिरिक्त, प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि 300 फ्री एसएमएस समाविष्ट आहेत. या प्लॅनमध्ये युजर्सना JioSaavn आणि JioCinema चे सबस्क्रिप्शन देखील मिळते.

Source link

amazon primejiopre-paid plansजिओप्री पेड प्लॅन्सॲमेझॉन प्राईम
Comments (0)
Add Comment