एअर कंडिशनरमध्ये वेलकम कूलिंग फिचर
सॅमसंग कंपनीच्या या एअर कंडीश्नर मध्ये वेलकम कुलिंग फिचर देण्यात आले आहे. या फिचरचा वापर करुन युजर्स लांबच्या अंतरावरून देखील एसी नियंत्रित करू शकतात. युजर्स मोबाईलद्वारे कमांड देऊ शकतात. तसेच, १५० मीटर ते ३० किलोमीटरपर्यंत याची रेंज असणार आहे.
कस्टमाइज वॉश सायकल
सॅमसंगचे नवीन फ्रण्ट लोड वॉशिंग मशिन AI कंट्रोलसह उपलब्ध असणार आहे. युजर्सच्या सवयीनुसार हे मशीन ऑटोमॅटीक सेट होईल. एआय वॉश फीचरमध्ये कपड्यांचे वजन, कपड्यांचा प्रकार व पाण्याची लेव्हल, सॉइलिंग लेव्हल आणि डिटर्जंट लेव्हल ओळखून त्यानुसार काम करते.
फ्रिज सुचवेल रेसिपी
युजर्स फ्रीजवर लावलेल्या स्क्रीनवर रेसिपी देखील बघू शकतात. तसेच, Ai तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवण्यात आलेल्या वस्तूंपासून बनवता येणाऱ्या रेसिपीबद्दलही सुचवणार आहे. सॅमसंगच्या बेस्पोक AI रेफ्रिजरेटरवर असलेल्या टीव्ही पॅनेलच्या मदतीने, स्मार्ट वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह आणि एसी इत्यादी नियंत्रित करू शकतो
सॅमसंगचा बेस्पोक एआय रेफ्रिजरेटर
सॅमसंगने बेस्पोक AI रेफ्रिजरेटर देखील लाँच केला आहे. हा फ्रीज स्मार्ट टीव्ही पॅनेलसह येणार आहे. या स्क्रीनवरून, वापरकर्ते त्यांच्या फ्रीजमध्ये असलेल्या सर्व वस्तू पाहू शकतात आणि त्यांची एक्सपायरी डेट देखील बघायला मिळणार आहे.
फ्रीजमध्ये एआय व्हिजन कॅमेरा
सॅमसंगच्या बेस्पोक AI रेफ्रिजरेटरमध्ये एआय व्हिजन कॅमेरा वापरण्यात आला आहे, जो सध्या ३३ वस्तू ओळखू शकतो. यासाठी फ्रीजच्या वरच्या बाजूला एक कॅमेरा बसवण्यात आला आहे.