११ बैलांची अवैध वाहतूक,४ जणांना अटक

जिल्हा संपादक : शैलेश चौधरी

एरंडोल: ११ जिवंत बैलांना कत्तलीसाठी नेण्याच्या उद्देशाने चार वाहनांतून अवैध वाहतूक करतांना एरंडोल तालुका विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी२१ सप्टेंबर २०२१ रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास रंगेहाथ पकडले.पशुधनासह चारही वाहने पोलिसांनी जप्त केली.विशेष हे की जवळपास महिन्याभरातच पशुधनाच्या अवैध वाहतुकीची केलेली ही पाचवी कारवाई आहे.

याबाबत एरंडोल पोलिस स्टेशनच्या सूत्रांनी दिलेली माहीती अशी की तुषार प्रभुलाल गोपाल रा.हाडाखेड शिरपूर,राहुल संतोष गोसावी रा.अहिल्यापुर ता. शिरपूर, शहारुख उर्फ रहीम पटेल रा. कंडारी तालुका धरणगाव, वसिम बाबु पटेल रा.कंडारी ता.धरणगाव या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.प्रकाश बद्रीनाथ पाटील यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर वाहने धरणगाव कडून येऊन एरंडोल मार्गे नेरी कडे जात होती असे सांगण्यात आले. एका वाहनात ४ , दुसऱ्या वाहनात ३, व उर्वरित दोन्ही वाहनात प्रत्येकी दोन असलेल्या अश्या एकूण ११ बैलांची मुक्तता करण्यात आली असून पुढील तपास एरंडोल पोलीस नाईक संदीप पाटील हे करीत आहेत.

करोनापुणेमुंबईशिवसेना
Comments (0)
Add Comment