मोफत राहणार नाही गुगल सर्च, ‘या’ फीचर्ससाठी मोजावे लागणार पैसे

‘Google कर!’ हे शब्द ऑनलाइन सर्चसाठी समानार्थी शब्द म्हणून वापरले जातात. परंतु मोफत गुगल सर्च साठी आता पैसे मोजावे लागू शकतात. परंतु संपूर्ण सर्चसाठी शुल्क आकारलं जाणार नाही तर गुगल फक्त AI-पावर्ड सर्चवरच पैसे द्यावे लागू शकतात. फायनान्शियल टाइम्सच्या एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की कंपनी आपल्या सर्च प्लॅटफॉर्मसह काही AI-पावर्ड फीचर्ससाठी प्रीमियम सब्सक्रिप्शन सुरु करण्याचा विचार करत आहे. परंतु काळजी करण्यासारखं काहीही नाही, कारण जाहीरतींसह पारंपरिक सर्च मोफत उपलब्ध राहील होईल आणि फक्त त्या लोकांना काही पैसे खर्च करावे लागतील ज्यांना AI फीचर्स हवे असतील.

पारंपरिक सर्च मध्ये कोणताही बदल नाही

अ‍ॅडव्हान्स एआय ड्रिवन फंक्शनॅलिटी जेमिनी अ‍ॅडव्हान्स किंवा गुगल वन सारख्या कंपनीच्या सब्सक्रिप्शन सर्व्हिसेसमध्ये इंटीग्रेट केले जातील, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे प्रीमियम युजर्सना देखील जाहिराती दिसतील तसेच स्टँडर्ड व्हर्जन देखील मोफत वापरता येईल.

AI ची मदत घेणार गुगल सर्च इंजिन

गुगल आपल्या नवीन अत्याधुनिक एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून आपलं सर्च इंजिन सुधारण्याचे प्रयत्न करत आहे. परंतु त्याचबरोबर जाहिरातींमधून देखील तेवढीच कमाई होईल हे देखील कंपनीला पाहावं लागेल. गेल्या वर्षी गुगलनं आपल्या जाहिरातींमधून सुमारे १७५ बिलियन डीलर्सची कमाई केली होती. ओपनएआय सारख्या कंपन्यांनी एआय क्षेत्रात स्पर्धा निर्माण केल्यामुळे गुगलला युजर्सना काही तरी चांगलं देण्याचे प्रयत्न करत आहे.

हा बदल गेल्यावर्षी मे मध्ये गुगलच्या एआय-पावर्ड सर्च सर्व्हिस, सर्च जेनरेटर एक्सपीरियंस (SGE) च्या माध्यमातून झाली. SGE पारंपरिक सर्च रिजल्ट आणि जाहिरातींसह थोडक्यात माहिती आणि रिस्पॉन्स देण्यासाठी एआय एल्गोरिदमचा उपयोग करतो. परंतु सुरुवातीला ऑप्ट-इन केल्यानंतर, गुगलनं अलीकडेच निवडक युजर्ससाठी SGE डिफॉल्ट एक्सपीरियंस बनवण्याचा प्रयोग केला आहे. परंतु, प्रायमरी सर्च इंजिन मध्ये इंटीग्रेशनन प्रोसेस थंडावली आहे, ज्याचा मुख्य कारण जेनरेटिव एआय मॉडेलसाठी आवश्यक महत्वपूर्ण कम्प्यूटेशनल रिसोर्स आहेत.

Source link

googlegoogle may charging for ai powered searchgoogle might start charging for ai powered searchgoogle searchगुगल
Comments (0)
Add Comment