तुमचा मोबाईल नंबर होणार आहे बंद; सरकारच्या इशाऱ्याकडे द्या लक्ष, अन्यथा होईल मोठे नुकसान

मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन अंतर्गत कार्यरत दूरसंचार विभागाने (DoT) मोबाईल युजर्ससाठी एक अलर्ट जारी केला आहे. ॲडव्हायझरीनुसार, दूरसंचार विभागाचे नाव देऊन फसवणूक कॉल केले जात आहेत, ज्यामध्ये सरकारला तुमच्या नंबरद्वारे चुकीचे काम केले जात असल्याचे तपासात आढळून आल्याचा दावा केला जात आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर डिस्कनेक्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या मोबाईल क्रमांकांपासून रहा सावध

दूरसंचार विभागाच्या म्हणण्यानुसार, या कामासाठी परदेशी मोबाइल नंबर (जसे की +92-xxxxxxxx) वापरले जात आहेत. तसेच या क्रमांकांवरून व्हॉट्सॲप कॉल केले जात आहेत. सरकारी सल्ल्यानुसार, घोटाळेबाज लोकांचे नंबर ब्लॉक करण्याची धमकी देऊन त्यांची वैयक्तिक माहिती चोरून बँकिंग फसवणूक केली जात आहे. दूरसंचार विभागाने स्पष्ट केले आहे की, दूरसंचार विभागाने असा कोणताही कॉल केलेला नाही. लोकांनाही सतर्क राहण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.

इथे करा तक्रार

तुम्हाला असे कॉल किंवा मेसेज येत असल्यास, तुम्ही संचार साथी पोर्टलच्या (www.sancharsathi.gov.in) ‘आय-रिपोर्ट सस्पेक्टेड फ्रॉड कम्युनिकेशन्स’ या फीचरवर त्याची तक्रार करू शकता. संचार साथीच्या ‘Know Your Mobile Connections’ या सर्व्हिसच्या मदतीने, रजिस्टर्ड मोबाईल कनेक्शन तपासले जाऊ शकतात आणि असे नंबर ब्लॉक केले जाऊ शकतात. बँकिंग फसवणूक झाल्यास, सायबर-क्राइम हेल्पलाइन नंबर 1920 वर कॉल आणि मेसेज करून तक्रार नोंदवता येईल. किंवा तुम्ही www.cybercrime.gov.in वरून तक्रार करू शकता.याशिवाय, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही थेट फोनवरून असे कॉल आणि मेसेज ब्लॉक करू शकता.

Source link

cyber crimedotfake callsडीओटीफसवणुक कॉलसायबर गुन्हे
Comments (0)
Add Comment