उन्हाळ्याच्या या दिवसांत उकाडा वाढत असतांनाच बाजारात फॅन्स, कूलर व एसीचे अनेक विविध पर्याय दाखल होत आहेत.
अशातच ‘Hisense’ या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपनीने देखील ‘Hisense CoolingExpert Pro Air Conditoners’ नावाची एसीची अत्याधुनिक रेंज भारतात लाँच केली आहे. जाणून घेऊया याविषयीची सविस्तर माहिती
अशातच ‘Hisense’ या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपनीने देखील ‘Hisense CoolingExpert Pro Air Conditoners’ नावाची एसीची अत्याधुनिक रेंज भारतात लाँच केली आहे. जाणून घेऊया याविषयीची सविस्तर माहिती
Hisense AC ची किंमत आणि उपलब्धता
नवीन Hisense CoolingExpert १ टन एअर कंडिशनर्सची किंमत भारतात रुपये 27,990 पासून सुरू होते. पुढे मॉडेलनुसार 1.5 टन 3 स्टार 29,990रुपये, 1.5 टन 5 स्टार 35,990 रुपये आणि 2 टन 3 स्टार 39,990 रुपये अशा किमतीत एसी उपलब्ध आहेत.
नवीन Hisense एअर कंडिशनर्स Amazon आणि Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध आहेत. दोन्ही ई-कॉमर्स पोर्टलवर HDFC बँक, ICICI बँक आणि OneCard क्रेडिट कार्ड व्यवहारांवर 2000 रुपयांपर्यंत बँक सवलत आहे. ग्राहक 12 महिन्यांपर्यंतच्या EMI मध्ये फ्लेक्सिबल पेमेंट ऑप्शन देखील निवडू शकतात. जुन्या एसीच्या मॉडेलनुसार 4000 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहेत.
Hisense CoolingExpert Pro AC चे फीचर्स
- Hisense CoolingExpert Pro ACs ची नवीन रेंज स्प्लिट डिझाइनमध्ये उपलब्ध आहे.
- या इन्व्हर्टर एसीमध्ये 4-इन 1 परिवर्तनीय मोड आहे जो युजरना 40%, 60%, 80% आणि 100% पॉवर रेंजमधून चॉईस देतो.
- Hisense CoolingExpert ACचा ‘क्विक चिल टर्बो मोड’ फॅनचा वेग जास्तीत जास्त वाढवतो आणि इन्स्टंट कूलिंग मिळवण्यासाठी इंटेलिजन्ट कंप्रेसरबरोबर कम्बाईन करतो.
- हे एसी ऑटो, कूल, ड्राय आणि फॅन मोड देखील देते, जे युजरना सर्व वेदर कंडिशनमध्ये पूर्ण फ्लेक्सीबिलिटी देते.
- यात ‘PM 2.5’ फिल्टर देखील आहेत जे धूळ आणि प्रदूषणापासून संरक्षण करतात.
- AC मध्ये अँटी-कोरोसिव्ह कोटिंगसह कॉपर कंडेन्सर असतात.यात इन्व्हॉयरमेंट फ्रेंडली ‘R32’ रेफ्रिजरंट देखील वापरले जातात.
- इनडोअर कॉइलवर थर तयार होण्यापासून रोखण्यासाठी एसी सेल्फ क्लिनिंगसाठी 33 भिन्न पॅरामीटर्ससाठी स्कॅन करू शकतो.
- AC 140-290V च्या व्होल्टेज रेंजमध्ये स्टॅबिलायझर-फ्री ऑपरेशन्सला देखील सपोर्ट करतात.
- नवीन HiSense CoolingExpert Pro ACs AC युनिटवर 1 वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी, PCB वर 5 वर्षांची वॉरंटी आणि कंप्रेसरवर 10 वर्षांची वॉरंटी देतात.